नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : बालरंगभूमी परिषद, मुंबई आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ या स्पर्धेत के.सी.ई. सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यालयाने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय पारितोषिक पटकावले.
विद्यालयातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘रेला’ नृत्याने आपल्या आकर्षक सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली. तसेच इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी निधी किशोर पाटील हिने सादर केलेल्या लावणी नृत्यानेही उपस्थितांची दाद मिळवत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर दीपमाला काळे, डॉ. केतकी पाटील, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष सरिता माळी आणि उद्योजक रजनीकांत कोठारी उपस्थित होते. तर पारितोषिक वितरण समारंभासाठी पीपल्स बँकेचे भालचंद्र पाटील, के. सी.ई.संस्थेचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कोषाध्यक्ष सचिन महाजन आणि उपाध्यक्ष नेहा पवार-गुजराथी उपस्थित होते.
विजेत्या संघाला स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या उल्लेखनीय यशामागे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींना नृत्याचे प्रशिक्षण योगेश भालेराव यांनी दिले.
या उपक्रमासाठी उपशिक्षिका कल्पना तायडे, दीपक पाटील आणि मनीषा दांडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल विद्यालयातील शिक्षकवृंद, पालक व शिक्षणप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





