• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

भिलपुरा चौकातील दर्ग्यावर महापौरांसह मान्यवरांच्या हस्ते मानाची चादर अर्पण अनेक वर्षांची परंपरा राहिली कायम

अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वी सामाजिक ऐक्य आणि धार्मिक सौहार्दाची परंपरा कायम; जिल्हाधिकारी, महापौरांसह मान्यवरांची उपस्थिती

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 26, 2026
in जळगाव, गणेशोत्सव
भिलपुरा चौकातील दर्ग्यावर महापौरांसह मान्यवरांच्या हस्ते मानाची चादर अर्पण अनेक वर्षांची परंपरा राहिली कायम
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : जळगाव शहरात अनंत चतुर्दशीनिमित्त श्री गणेशाचे विसर्जन शुक्रवारी अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडले. जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जनापूर्वी वर्षांनुवर्षांची सामाजिक ऐक्याची आणि धार्मिक सौहार्दाची परंपरा यंदाही तितक्याच श्रद्धेने जपण्यात आली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान भिलपुरा चौकातील ऐतिहासिक ‘हजरत पीर लालशहा सरकार’ दर्ग्यावर महानगरपालिकेच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे व अधिकाऱ्यांच्या हस्ते मानाची चादर अर्पण करण्यात आली. यानंतर विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाल्या.

या प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि प्रांताधिकारी योगेश कुमार मीना यांनी दर्ग्यात उपस्थित राहून ही पारंपरिक विधी पूर्ण केली. चादर अर्पण केल्यानंतर महापालिकेच्या मानाच्या गणपतीची सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिशय मंगलमय वातावरणात महाआरती करण्यात आली. महाआरती संपन्न झाल्यानंतर श्री गणेशमूर्ती विसर्जन मार्गाने पुढे रवाना झाली.

महाआरतीला उपमहापौर मनोज चौधरी, तहसीलदार शितल राजपूत, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त पंकज गोसावी, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ते अयाज अली यांच्यासह महानगरपालिका व पोलीस प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: अनंत चतुर्दशीगणेश विसर्जनजळगावभिलपुरा चौकमानाची चादरहजरत पीर लालशहा सरकार
Previous Post

जल्लोष लोककलेचा स्पर्धेत गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाचे यश

Next Post

जल्लोष लोककलेचा स्पर्धेत गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाचे यश

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जल्लोष लोककलेचा स्पर्धेत गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाचे यश

जल्लोष लोककलेचा स्पर्धेत गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif