• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आ. राजूमामा भोळे; पंचनामे व भरीव मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार

जळगाव शहरातील शेतशिवारांची प्रत्यक्ष पाहणी; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 24, 2026
in जळगाव, Uncategorized, कृषी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आ. राजूमामा भोळे; पंचनामे व भरीव मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : जळगाव शहरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसाअभावी झालेल्या नुकसानीची आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व भावना जाणून घेतल्या. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी बोलताना आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, “आज शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करताना परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनसह विविध पिके सुकून गेली असून, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न राहिलेले नाही. शेतकऱ्यांनी आपल्या घरातील उपलब्ध पैसा शेतीत खर्च केला; मात्र आता पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.”

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना भरीव नुकसानभरपाई मिळावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, याबाबत मुख्यमंत्री, कृषिमंत्री तसेच संबंधित विभागांकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले.

मागील काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह वीजबिलाच्या प्रश्नावर शासनाने निर्णय घेतले असून, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून जळगाव शहरासह संबंधित नुकसानग्रस्त भागात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा योग्य विचार करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात येणार आहे.

ते म्हणाले, “दुष्काळाची परिस्थिती केवळ कागदावर किंवा निकषांवर न पाहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणे आवश्यक आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या विहिरीत थोडेफार पाणी उपलब्ध असल्यामुळे त्याचे पीक चांगले आहे, असे गृहीत धरून त्याला मदतीपासून वंचित ठेवू नये. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शंभर टक्के शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासनाकडे आग्रही मागणी करण्यात येईल.”

शेतकऱ्यांच्या भावना प्रत्यक्ष जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असून, “निसर्ग आपल्या हातात नाही; मात्र संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. शेतकऱ्यांची नाराजी व चिंता दूर करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू,” असे आमदार राजूमामा भोळे यांनी स्पष्ट केले.

यावेळी पाहणीदरम्यानच मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे परिस्थिती मांडण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणार असून नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी पंचनाम्यांपासून प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका आमदारांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावपंचनामेपिकांचे नुकसानशेतकरीशेतकरी नुकसानभरपाईसोयाबीन
Previous Post

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

Next Post

जल्लोष लोककलेचा स्पर्धेत गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाचे यश

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

जल्लोष लोककलेचा स्पर्धेत गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif