• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home श्रीनगर

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

कृषी अभियांत्रिकीतील भरीव योगदानाची दखल; श्रीनगर येथे पुरस्कार प्रदान

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 11, 2026
in श्रीनगर, कृषी
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

श्रीनगर : कृषी अभियांत्रिकी, तांत्रिक नवोपक्रम आणि शाश्वत शेतीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रीकल्चरल इंजिनिअर्स (ISAE) तर्फे जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ पुरस्कार श्रीनगर येथे नुकताच प्रदान करण्यात आला. आयएसएईचे अध्यक्ष डॉ. एस. एन. झा यांच्या हस्ते कंपनीच्यावतीने वरिष्ठ सहकारी, कृषी अभियंता सोमनाथ जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

जैन इरिगेशनने प्रिसिजन फार्मिंग, सूक्ष्मसिंचन, संरक्षित शेती आणि क्लायमेट-स्मार्ट ॲग्रीकल्चरमधील आपल्या अग्रगण्य कार्याद्वारे भारतीय शेतीत परिवर्तन घडवून आणण्यात पुढाकार घेतला आहे. कंपनीने ठिबक आणि तुषार सिंचन, फर्टिगेशन, क्लायमेट स्मार्ट सोल्युशन्स, हरितगृहे, प्रगत टिश्यू कल्चर लागवड साहित्य, सौरऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन प्रणाली आणि आधुनिक जल व्यवस्थापन तंत्रज्ञान इत्यादींचा समावेश असलेले एकात्मिक कृषी उपाय विकसित केलेले आहेत.

‘मोअर क्रॉप पर ड्रॉप’ हे जैन इरिगेशनचे ब्रीदवाक्य आहे. त्यानुसार जैन इरिगेशनने शेतकऱ्यांना पाणी आणि पोषक घटकांच्या वापराची कार्यक्षमता सुधारण्यास, पिकांची उत्पादकता वाढवण्यास, लागवडीचा खर्च कमी करण्यास आणि अधिक परतावा मिळवण्यास मदत केली आहे. हरितगृह शेती, उच्च-तंत्रज्ञान फलोत्पादन आणि शाश्वत शेती यांमधील उपक्रमांमुळे संसाधनांचा कार्यक्षम वापर करणाऱ्या शेतीला चालना मिळाली आहे; तसेच कंपनीचे हवामान-अनुकूल उपाय बदलत्या हवामान परिस्थितीशी आणि वाढत्या पाणीटंचाईशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना मदत करतात.

संशोधन, नवोपक्रम आणि प्रत्यक्ष शेतावरील अंमलबजावणी यांवर विशेष भर देऊन, जैन इरिगेशन कृषी अभियांत्रिकी आणि प्रत्यक्ष शेतीचे व्यवहार यांमधील दुवा साधण्याचे अविरतपणे कार्य करत आहे. जैन इरिगेशनकडे ८०० हून अधिक तज्ज्ञ कृषी अभियंत्यांची समर्पित टीम आहे, जी तंत्रज्ञान विकास, शेतकरी प्रशिक्षण आणि आधुनिक कृषी पद्धतींचा अवलंब यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: कृषी अभियांत्रिकीकृषी तंत्रज्ञानजैन इरिगेशनठिबक सिंचनशाश्वत शेतीसूक्ष्मसिंचन
Previous Post

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

Next Post

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif