• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी ; सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी महिलेला मुद्देमाल सुपूर्द

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 12, 2026
in जळगाव, क्राईम
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : जळगाव शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करून एमआयडीसी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीला गेलेले तब्बल ३२ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर हा मुद्देमाल फिर्यादी महिला संगीता राजू धुये यांना परत करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महानगर परिसर, रामेश्वर कॉलनी आणि जळगाव येथील रहिवासी संगीता राजू धुये यांच्या बंद घराचे कडी-कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा एमआयडीसी पोलिसांनी सखोल तपास करून आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. त्यानंतर जप्त केलेला मुद्देमाल परत मिळवण्यासाठी फिर्यादी महिलेने जळगाव न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुद्देमाल परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एकूण ३२ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम फिर्यादी संगीता राजू धुये यांना सुपूर्द करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गापाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबन आव्हाड तसेच तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारे तो मूळ मालकाला परत मिळवून देणे, ही एमआयडीसी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: ३२ लाखांचा मुद्देमालएमआयडीसी पोलीसघरफोडीचोरी प्रकरणजळगावसोन्या - चांदीचे दागिने
Previous Post

जळगाव जिल्ह्यात ६६ कोटी ७० लाखांचे अंमली पदार्थ नष्ट; ४६.१५४ ग्रॅम अंम्फेटामाइनसह मेथाक्वालोनचा समावेश

Next Post

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif