• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

प्रथम वर्धापनदिनानिमित्त ‘कृतज्ञता महोत्सव’ व ‘स्वर्ण शृंगार’ ऑफरचे आयोजन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 12, 2026
in जळगाव, Uncategorized
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि दर्जेदार दागिन्यांची परंपरा जपणाऱ्या शहरातील रिंग रोड स्थित ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ यांच्या वर्धापनदिनानिमित्त ११ ते २० ऑक्टोबर २०२६ दरम्यान ‘कृतज्ञता महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात २४ कॅरेट सोन्याच्या शिक्क्यांवर कोणतीही मजूरी नाही हा विशेष लाभ ग्राहकांना मिळणार आहे.

घटस्थापनेला ‘कृतज्ञता महोत्सवा’चे थाटात शुभारंभ

बाफना कुटुंबाची पवित्रता, पारदर्शकता आणि विश्वासाची पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा एका नवीन रूपात पुढे नेण्याची वचनबद्धता होती. या एका वर्षाच्या प्रवासात, समाजाकडून मिळालेले प्रेम, ग्राहकांकडून मिळालेला विश्वास आणि प्रत्येक प्रयत्नासाठी मिळालेली आपुलकी, ही कोणत्याही यशापेक्षा अधिक मौल्यवान आहे. हे यश ग्राहकांच्या विश्वासाचे यश आहे. आणि या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘कृतज्ञता महोत्सवा’चे आज सकाळी ११.३० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून थाटात शुभारंभ करण्यात आले. यावेळी शहरातील मान्यवर खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे उर्फ राजुमामा, डॉ. उल्हास पाटील, डॉ. वैभव पाटील, अनिल कांकरिया, लखीचंद जैन, डॉ. आकाश जैन यांच्यासह ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’चे कस्तूरचंद बाफना, सुनील बाफना, सौ.अनिता बाफना, अभिषेक बाफना, सौ.आयुषी बाफना, ऋषभ बाफना, सौ.ऐश्वर्या बाफना, चि. देशना व सहकारी वर्ग तसेच ग्राहक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता. दरम्यान जळगाव जिल्हाधिकारी रोहन

घुगे यांनी दालनाला भेट देत नव्या वास्तूच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व दालनातील सोने, चांदी व हिऱ्यांच्या विविध मनमोहक दागिन्यांची शृंखला निरखून ही पाहिली.

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’चा वर्षपूर्ती प्रवास

 

‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ने २०२१ मध्ये चांदीचे दागिने, चांदीच्या वस्तू, पूजासाहित्य, हिरे आणि राशिरत्नांच्या माध्यमातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत ग्राहकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ने आपल्या सेवांचा विस्तार केला. गतवर्षी २२ सप्टेंबर २०२५ रोजी अर्थात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेला नव्या भव्य दालनात सुवर्ण दागिन्यांच्या क्षेत्रात पदार्पण करत व्यवसायाचा नवा अध्याय सुरू केला.

‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’च्या या प्रवासात ग्राहकांनी दिलेले प्रेम, विश्वास आणि सहकार्य मोलाचे असल्याचे नमूद करत, त्यांच्या विश्वासाला अधिक दृढ करण्यासाठी ‘कृतज्ञता महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. पारदर्शक व्यवहार, योग्य मूल्य, माफक मजूरी आणि ग्राहकांना वैयक्तिक मार्गदर्शन ही ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वैशिष्ट्ये आहेत.

‘स्वर्ण शृंगार’अंतर्गत दागिन्यांच्या घडणावळीवर विशेष सवलती

ही योजना १४ डिसेंबर २०२६ पर्यंत

नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच येणाऱ्या लग्नसराईनिमित्त दागिने खरेदीसाठी ‘स्वर्ण शृंगार’ योजनेत ग्राहकांसाठी दागिन्यांच्या घडणावळीवर आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट २५ टक्के सूट, हिरे व पोल्की दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट ३० टक्के सूट, तर चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर १५ टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच चांदीच्या वस्तूंच्या एमआरपीवर थेट १० टक्के सूट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ‘स्वर्ण शृंगार’ या योजनेचा कालावधी ११ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर २०२६ पर्यंत राहणार आहे.

याशिवाय प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे पारदर्शक भाव, माफक मजुरी, शुद्धतेची खात्री, प्रमाणित दागिने आणि ग्राहकाभिमुख सेवा. उत्सवाच्या काळात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना दागिने व वस्तूंच्या खरेदीत विशेष लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.

योजना मर्यादित कालावधीसाठी असल्यामुळे ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ने जळगावकरांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जळगाव शहरातील रिंग रोडवर स्थित जेडीसीसी बँकेसमोर असलेल्या या भव्य दालनात ग्राहकांनी भेट देऊन सुवर्ण, चांदी, पोल्की आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या आकर्षक शृंखलेला अवश्य पहावे, असे आवाहन ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ तर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: कृतज्ञता महोत्सवजळगावबाफना ज्वेलर्सबाय बाफनाज्स्वर्ण शृंगारहाऊस ऑफ ज्वेल्स
Previous Post

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

Next Post

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif