नवराज्य Live न्यूज नेटवर्क
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त भाजप जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध कार्यक्रम राबवले यामध्ये सर्वप्रथम जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे सकाळी दहा वाजता गरीब व गरजू रुग्णांना अन्नदान व फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास
आ सुरेश भोळे राजूमामा
जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी
महापौर सौ. दीपमाला ताई काळे तसेच जिल्हा पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी 7:30 वाजता भाजप कार्यालय जि एम फाउंडेशन येथे गणपतीची महाआरती करून 75 दिवे लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी खा स्मिताताई वाघ आ सुरेश भोळे, महापौर दीपमालाताई काळे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी स्थायी समिती सभापती डॉ चंद्रशेखर पाटील गटनेते प्रकाश बालाणी माजी महापौर सीमाताई भोळे, माजी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, कार्यक्रमाचे संयोजक दीपक परदेसी उदय जी भालेराव, तसेच जिल्हा पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
आपला नम्र
मनोज भांडारकर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख





