नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर तसेच ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने केसीई सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त शालेय एकपात्री नाट्यछटा स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटक वैभव मावळे (मु. जे. महाविद्यालय, नाट्य विभाग प्रमुख), ज्येष्ठ रंगकर्मी व स्पर्धेचे परीक्षक धनंजय राजहंस, मंजिरी राजहंस, शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे तसेच एकनाथ पाचपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेशपूजनाने झाली.
स्पर्धा प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक अशा तीन गटांमध्ये घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, ऐतिहासिक व मनोरंजक विषयांवर प्रभावी एकपात्री नाट्यछटा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ‘डी.जे.चा भस्मासुर’, ‘मी प्लास्टिक बोलते’, ‘हिरकणी’, ‘माझे आभाळ माझे पंख’, ‘कंटाळा आलाय’, ‘शेतातली न्याहारी’, ‘मी गंगू’, ‘विसरभोळी गोदा’, ‘फुलराणी’, ‘मूषकराज’ आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयकौशल्याचे दर्शन घडवले.
गट पहिला : इयत्ता ३ री व ४ थी
प्रथम : कु. आराध्या गणेश पाटील — गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय
द्वितीय : कु. मेघना सुनील शिंदे — शा. ल. खडके प्राथमिक विद्यामंदिर
तृतीय : कु. इशिका शरीफ तडवी — बालनिकेतन विद्यामंदिर
उत्तेजनार्थ प्रथम : कु. नित्या शुक्ला — अविनाश आचार्य विद्यालय
उत्तेजनार्थ द्वितीय : कु. प्रेषिता नंदकिशोर ढोले — ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल
गट दुसरा : इयत्ता ५ वी ते ७ वी
प्रथम : कु. डिंपल दीपक सपके — प. न. लुंकड कन्या शाळा
द्वितीय : कु. अनुश्री अनिल चौधरी — ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय
तृतीय : कु. काव्या राजेश बांदल — विद्या विकास मंदिर शाळा
उत्तेजनार्थ प्रथम : कु. जिनल राहुल वायसे — विद्या विकास मंदिर शाळा
उत्तेजनार्थ द्वितीय : कु. धनश्री योगेश भारुडे — ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय
गट तिसरा : इयत्ता ८ वी ते १० वी
प्रथम : कु. दर्शना संजय जगताप — ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालय
द्वितीय : कु. लावण्या किशोर नारखेडे — नंदिनीबाई वामनगाव मुलींचे विद्यालय
तृतीय : कु. पूजा हेमंत भट — ओरियन इंग्लिश स्कूल
उत्तेजनार्थ प्रथम : कु. केतकी राजेश कोरे — प. न. लुंकड कन्या शाळा
उत्तेजनार्थ द्वितीय : कु. योगेश्वरी भटू सैदाणे — प. न. लुंकड कन्या शाळा
स्पर्धेतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, ज्येष्ठ रंगकर्मी तथा स्पर्धेचे परीक्षक धनंजय राजहंस आणि मंजिरी राजहंस यांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक चंद्रकांत कोळी, योगेश भालेराव आणि पराग राणे यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र मिरकुटे व रत्नमाला शिंदे यांनी केले. उपशिक्षिका भावना धांडे व पल्लवी टोके यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.





