• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावात महापौर दीपमाला काळेंचा पाहणी दौरा; अस्वच्छतेवरून सफाई ठेकेदाराला झापले

जुन्या टी.बी. सेंटर परिसरातील पाहणीत घंटागाड्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर; नादुरुस्त घंटागाड्या तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 18, 2026
in जळगाव, Uncategorized, स्थानिक बातम्या
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : जुन्या टी.बी. सेंटर परिसरात जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी पाहणी दौरा केला. या पाहणीदरम्यान कामातील त्रुटी आणि अस्वच्छतेवरून महापौरांनी सफाई ठेकेदाराला चांगलेच झापले. तसेच घंटागाड्यांची वेळेवर स्वच्छता न राखल्याबद्दल बिव्हिजी कंपनीच्या प्रतिनिधीला तीव्र शब्दांत जाब विचारला.

या पाहणी दौऱ्याला उपमहापौर मनोज चौधरी, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता योगेश बोरोले आणि अभियंता योगेश वाणी आदी अधिकारी उपस्थित होते. महापौरांनी रॅम्पच्या बांधकामाची पाहणी करून विकासकाला विविध दुरुस्त्यांच्या सूचना दिल्या. शहर अभियंत्यांनी रॅम्पवर वाहन चढवून घेतलेल्या चाचणीचा व्हिडीओ मोबाईलवर महापौरांना दाखवला. रॅम्पवर बंदिस्त छत असल्याने काम अधिक व्यवस्थित होईल, असा विश्वास अभियंत्यांनी व्यक्त केला.

“घंटागाड्या नियमित वॉशिंग का केल्या जात नाहीत? या कामात हलगर्जीपणा का केला जातोय?” असा सवाल महापौरांनी बिव्हिजी कंपनीच्या प्रतिनिधीला विचारला. यावर ८८ पैकी ६० घंटागाड्या सुरू असून काही गाड्यांचे पार्ट मिळत नसल्याने त्या नादुरुस्त असल्याचे प्रतिनिधीने सांगितले.

घंटागाड्यांच्या येण्या-जाण्यासाठी रस्ता तात्काळ सरळ करावा आणि शहरातील कचरा साचण्याची समस्या लवकरात लवकर दूर करावी. बंद पडलेल्या सर्व नादुरुस्त घंटागाड्यांची तात्काळ दुरुस्ती करून त्या सेवेत दाखल कराव्यात, अशा सूचना महापौर दीपमाला काळे यांनी दिल्या.

बातमी शेअर करा !
Tags: कचरा व्यवस्थापनघंटागाडीजळगावजळगाव महानगरपालिकादीपमाला काळेमहापौर दीपमाला काळे
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 76 वाढदिवस वा सेवा संकल्प अभियान साजरा

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा संकल्प अभियान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा संकल्प अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

October 15, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif