• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी ‘रेट’ ठरला; १५ हजारांची लाच घेताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा भन्नाट सापळा; वेषांतर करून चार दिवसांनंतर कारवाई यशस्वी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 2, 2026
in जळगाव, क्राईम
उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी ‘रेट’ ठरला; १५ हजारांची लाच घेताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : वडिलोपार्जित घराच्या उताऱ्यावर वडिलांचे नाव पुन्हा नोंदवून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५, रा. भूषण कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे एसीबी कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालय अवघ्या १०० फुटांच्या अंतरावर असल्याने ही कारवाई अत्यंत गुप्त पद्धतीने पार पाडावी लागली.

गेल्या चार दिवसांपासून एसीबीचे पथक आरोपीवर नजर ठेवून होते. मात्र दोन्ही कार्यालयांतील कर्मचारी एकमेकांना ओळखत असल्याने सापळा यशस्वी होत नव्हता. अखेर बुधवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी वेषांतराचा मार्ग स्वीकारला. कुणी सामान्य नागरिक बनून परिसरात फिरत होते, कुणी दुचाकी बंद पडल्याचे नाटक करत होते, तर काही कर्मचारी शेंगदाणे स्टॉलजवळ उभे राहून हालचालींवर लक्ष ठेवून होते.

पूर्वनियोजनानुसार तक्रारदाराने भूकरमापक जितेंद्र पाटील याला १५ हजार रुपयांची लाच दिली. लाच स्वीकारल्यानंतर तक्रारदाराने चेहऱ्याचा घाम पुसण्यासाठी खिशातून रुमाल काढला. हा पूर्वनियोजित संकेत मिळताच परिसरात दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला पंचांसमक्ष लाचेच्या रकमेसह पकडले.

तक्रारदाराचे जळगाव शहरात वडिलोपार्जित घर असून, त्या मालमत्तेच्या नोंदीत फेरफार करून त्यांच्या काकांनी स्वतःचे नाव लावले होते. याविरोधात तक्रारदाराने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अपील दाखल केले होते. सुनावणीनंतर संबंधित फेरफार रद्द करून तक्रारदाराच्या वडिलांचे नाव पुन्हा उताऱ्यावर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आदेशानंतरही प्रत्यक्ष नोंद दुरुस्त होत नसल्याने तक्रारदाराने वारंवार पाठपुरावा केला.

दरम्यान, भूकरमापक जितेंद्र पाटील यांनी हे काम करून देण्यासाठी “साहेबांना पैसे द्यावे लागतील” असे सांगत लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने २५ जून रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान १५ हजार रुपयांची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचत ही कारवाई केली.

या कारवाईत पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, हेमंत नागरे, सुरेश पाटील, संगीता पवार, राकेश दुसाने, प्रदीप पोळ आणि मनोज पाटील यांनी सहभाग घेतला. आरोपीविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

बातमी शेअर करा !
Tags: एसीबीजळगावजितेंद्र पाटीलभुकरमापकभूमीअभिलेखलाचखोरी
Previous Post

जळगाव महापालिकेतील ‘भूसंपादन घोटाळा’ अधिवेशनात गाजला!

Next Post

आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif