• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 2, 2026
in जळगाव, Uncategorized, सामाजिक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

पाळधी/जळगाव : रक्षाबंधन म्हणजे भाऊ – बहिणीच्या नात्याचा उत्सवासोबत प्रेम, विश्वास, आपुलकी आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा भावनिक धागा. याच धाग्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत पाळधी येथे अंध, दिव्यांग व अनाथ भगिनींसोबत GPS मित्र परिवाराने ‘अतूट धागा मायेचा’ हा आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा साजरा केला. राखीच्या निमित्ताने मायेच्या नात्यापासून वंचित राहू नये, या भावनेतून आयोजित या उपक्रमाने रक्षाबंधनाला माणुसकीचा नवा अर्थ दिला.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रतापराव पाटील यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या नेतृत्वात GPS मित्र परिवाराच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गरजू आणि वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या याच सेवाभावी परंपरेतून या विशेष रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सोहळ्यात अंध, दिव्यांग व अनाथ भगिनींना सन्मानाने सहभागी करून घेत त्यांच्यासोबत रक्षाबंधनाचा आनंद वाटून घेण्यात आला. भगिनींनी GPS परिवारातील भावांच्या मनगटावर राखी बांधली, औक्षण केले आणि क्षणभरात रक्ताच्या नात्यापलीकडचे मायेचे नाते जुळले. भगिनींच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद आणि उपस्थितांच्या डोळ्यांत दाटलेले भाव या सोहळ्याला अधिक हृदयस्पर्शी बनवून गेले. त्यांच्या सुख-दुःखात आणि गरजेच्या प्रत्येक प्रसंगी GPS परिवार सोबत राहील, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.

GPS मित्र परिवाराच्या माध्यमातून आरोग्य व नेत्रतपासणी शिबिरे, मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी मदत, रक्तदान, गरजू कुटुंबांना सहाय्य, युवकांसाठी रोजगारविषयक तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याच सामाजिक जाणिवेला रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याची जोड या उपक्रमातून मिळाली.

राखी मनगटावरची नव्हे, माणुसकीच्या नात्याची…

‘राखी केवळ मनगटावर बांधली जात नाही; ती माणसाला माणसाशी जोडते,’ याची जिवंत अनुभूती या सोहळ्यात आली. समाजातील विशेष गरजा असलेल्या भगिनींसोबत सणाचा आनंद वाटून घेत GPS मित्र व मैत्रीण परिवाराने राखीचा धागा माया, स्नेह, विश्वास आणि आधाराचे नाते अधिक घट्ट करणारा असल्याचा संदेश दिला. ‘सणाचा खरा आनंद आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्यात आहे,’ ही भावना अधोरेखित करणारा हा संवेदनशील उपक्रम जिल्ह्यात व उपस्थितांसाठीही अविस्मरणीय ठरला.

बातमी शेअर करा !
Tags: GPS मित्र परिवारअतूट धागा मायेचाजळगावदिव्यांग भगिनीपाळधीरक्षाबंधन
Previous Post

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

Next Post

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif