• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

आमदार राजूमामा भोळे यांचे विशेष सहकार्य; पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कौतुकास्पद उपक्रम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 3, 2026
in जळगाव, Uncategorized, सामाजिक
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : बातमीच्या शोधात शहरापासून ग्रामीण भागापर्यंत दिवसभर दुचाकीवरून धावपळ करणाऱ्या पत्रकार आणि छायाचित्रकारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन, जळगाव यांच्यातर्फे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनच्या वतीने जळगाव शहरातील सदस्य, वृत्तपत्रांचे छायाचित्रकार तसेच डिजिटल मीडिया प्रतिनिधींसाठी मोफत अपघाती विमा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत सुमारे १०० पत्रकार व मीडिया प्रतिनिधींचा प्रत्येकी १० लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला. त्यामुळे संबंधित पत्रकाराचा अपघाती मृत्यू किंवा विमा योजनेतील नियमानुसार अपघाती दुखापत झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.

 

पत्रकारांचे काम हे केवळ कार्यालयापुरते मर्यादित नसते. अपघात, गुन्हे, नैसर्गिक आपत्ती, राजकीय कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच विविध घटनांचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार आणि छायाचित्रकारांना दिवस-रात्र शहरासह ग्रामीण भागात प्रवास करावा लागतो. अनेकदा तातडीच्या बातमीसाठी धावताना त्यांना वाहतुकीच्या धोक्यांनाही सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळावी आणि पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने हाताळला जावा, या उद्देशाने फाउंडेशनने हा उपक्रम राबविला.

 

या सामाजिक उपक्रमासाठी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांचे मोलाचे व विशेष सहकार्य लाभले. पत्रकारांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या सुरक्षेसाठी सहकार्य केल्याबद्दल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार भोळे यांचे आभार व्यक्त केले. हे विमा शिबिर प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित देशमुख, प्रभारी अध्यक्ष सचिन पाटील, सचिव अभिजीत पाटील आणि सहसचिव हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून यशस्वीरीत्या पार पडले.

 

शिबिराच्या आयोजनासाठी प्रकाश लिंगायत, जुगल पाटील, भूषण पाटील, अरुण इंगळे, संधीपाल वानखेडे आणि पांडुरंग महाले यांनी विशेष परिश्रम घेतले. विमा शिबिराच्या माध्यमातून पत्रकारांच्या आरोग्य व आर्थिक सुरक्षेच्या प्रश्नाकडे सकारात्मक पाऊल टाकण्यात आल्याने पत्रकार वर्गातून या उपक्रमाचे स्वागत व कौतुक होत आहे. पत्रकारांच्या व्यावसायिक कामासोबतच त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याची काळजी घेणे हीदेखील सामाजिक जबाबदारी आहे. या भावनेतून भविष्यातही पत्रकारांच्या हितासाठी विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सुरक्षा उपक्रम राबविण्याचा मानस प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा !
Tags: अपघाती विमाजळगावपत्रकारपत्रकार सुरक्षाप्रेस फोटोग्राफर फाउंडेशनराजूमामा भोळे
Previous Post

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

Next Post

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif