• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home अधिवेशन

जळगाव महापालिकेतील ‘भूसंपादन घोटाळा’ अधिवेशनात गाजला!

आमदार सुरेश भोळेंचा १५० कोटींच्या आर्थिक फटक्याचा गंभीर आरोप; पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 2, 2026
in अधिवेशन, घोटाळा, जळगाव
जळगाव महापालिकेतील ‘भूसंपादन घोटाळा’ अधिवेशनात गाजला!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्यLive न्यूज नेटवर्क 

जळगाव : जळगाव महापालिकेतील शिवाजीनगर परिसरातील भूसंपादन प्रकरण आता थेट राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात पोहोचले असून, या प्रकरणामुळे महापालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आमदार सुरेश भोळे यांनी बुधवारी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत भूसंपादन प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. या संपूर्ण व्यवहारात महापालिकेचे काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी सरकारकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.

भूसंपादन प्रकरण आता थेट राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात पोहोचले असून, या प्रकरणामुळे महापालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आमदार सुरेश भोळे यांनी बुधवारी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत भूसंपादन प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. या संपूर्ण व्यवहारात महापालिकेचे काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी सरकारकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.

 

शिवाजीनगर परिसरातील योजना तसेच शाळा आणि घरकुल रस्त्यासाठी महापालिकेकडून दोन स्वतंत्र जागांचे भूसंपादन करण्यात आले होते. संबंधित जागांचा मोबदला अदा झाल्यानंतर वाढीव भरपाईसाठी न्यायालयात दावे दाखल करण्यात आले. मात्र, या प्रकरणात महापालिकेकडून न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडण्यात अपयश आल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी, महापालिकेवर तब्बल १५० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडल्याचे समोर आले आहे.

 

अधिवेशनात बोलताना आमदार भोळे यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती आधीच डळमळीत असताना चुकीच्या मूल्यांकनामुळे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या पैशांचा मोठा फटका बसल्याचे सांगितले. या व्यवहारामागे संगनमताचा संशय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केल्याचे सांगत सरकारने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

या वक्तव्यामुळे जळगाव महापालिकेतील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आमदार भोळे यांनी कोणत्याही पदाधिकाऱ्याचे नाव जाहीरपणे घेतले नसले तरी त्यांच्या सूचक आरोपांमुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणातही चर्चांना उधाण आले आहे. महापालिकेतील ‘भूखंडाचे श्रीखंड’ पुन्हा एकदा राज्यपातळीवर चर्चेचा विषय ठरले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: आमदार सुरेश भोळेआर्थिक फटकाघोटाळाजळगावभूसंपादनमहापालिकालक्षवेधीविधानसभा
Previous Post

धोकादायक इमारतीचा भाग कोसळून चारचाकी वाहन दबले ; नागरिकांचा जीव मुठीत!

Next Post

उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी ‘रेट’ ठरला; १५ हजारांची लाच घेताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी ‘रेट’ ठरला; १५ हजारांची लाच घेताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी ‘रेट’ ठरला; १५ हजारांची लाच घेताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif