• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

६८५ युवतींचा सहभाग; १५ महिला गोविंदा पथकांना दहीहंडी फोडण्याची समान संधी — महिला खेळाडूंच्या कर्तृत्वातून मिळणार प्रेरणा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 4, 2026
in जळगाव
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवतींची दहीहंडी २०२६’चा थरार शनिवारी (दि. ५) शिवतीर्थ मैदानावर रंगणार आहे. नारीशक्तीचा साहसी आविष्कार, युवतींच्या धाडसाचे दर्शन आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष असा हा अनोखा सोहळा सायंकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळेत होणार आहे.

युवतींनी मानवी मनोरे रचण्याचा कसून सराव केला असून, दहीहंडी फोडण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे, मैदानावर उभारण्यात येणाऱ्या १५ दहीहंड्यांवर देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंची पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. त्यांच्या कर्तृत्वातून सहभागी युवतींना प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

१५ महिला गोविंदा पथकांतील ६८५ युवतींचा सहभाग

‘युवतींची दहीहंडी २०२६’मध्ये किड्स गुरूकूल इंटरनॅशनल, अनुभूती स्कूल, आर. आर. विद्यालय, केसीई सोसायटी मुलींचे वसतिगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, एस. ए. बाहेती महाविद्यालय, त्रिमूर्ती महाविद्यालय, केसीई इंजिनिअरिंग कॉलेज, हरिजन कन्या छात्रालय, एल. एच. पाटील पब्लिक स्कूल, के. के. इन्स्टिट्यूट ऑफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल आदी शाळा-महाविद्यालयांतील १५ महिला गोविंदा पथकांमधील तब्बल ६८५ युवती सहभागी होणार आहेत.

सहभागी युवतींच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली असून, प्रत्येक महिला गोविंदाचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा आयोजकांकडून उतरविण्यात आला आहे.

स्पर्धा नव्हे, उत्सव; सर्वांना समान संधी

हा केवळ स्पर्धेचा कार्यक्रम नसून समता आणि समान संधीचा उत्सव असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सहभागी सर्व १५ संघांना दहीहंडी फोडण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी मैदानावर १५ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक दहीहंडीवर भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचे पोस्टर्स लावण्यात येणार आहेत.

युवतींसाठी ६३ हजार ३३३ रुपयांची पारितोषिके

मागील वर्षी समारोपावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी युवतींसाठी रोख पारितोषिकांची घोषणा केली होती. त्याची यंदा पूर्तता करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार १११ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ११ हजार १११ रुपये, अशी एकूण ६३ हजार ३३३ रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

उत्कृष्ट साहसी खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या युवतींचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असून, सर्व सहभागी संघांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत

उडाण फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, ग्लॅडिएटर डान्स क्लासेस, किड्स गुरूकूल इंटरनॅशनल स्कूल आणि एल. एच. पाटील पब्लिक स्कूलतर्फे सांस्कृतिक नृत्य सादर केले जाणार आहे. के. के. इन्स्टिट्यूट ऑफ योगा आणि एकलव्य मल्लखांब अकादमीतर्फे रोप मल्लखांब व योगनृत्याचे सादरीकरण होईल.

कु. कल्याणी महाजन व श्रीराम गुरूकुलतर्फे मर्दानी खेळाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. नागपूरच्या सुनिता मौर्य आणि महिमा मौर्य हुला हूप नृत्य सादर करतील. पुण्याचे कामत काका रशियन शैलीतील नृत्य सादर करणार आहेत.

२१३ ढोलवादकांचा दणदणाट

‘शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांतील तब्बल २१३ ढोलवादक दमदार वादनाने शिवतीर्थ मैदानाचा परिसर दणाणून सोडणार आहेत. यासोबत मर्दानी खेळ, चिमुकल्यांचे सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि आकर्षक आतषबाजी ही कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे ठरणार आहेत.

शहरातील १५ रील्स स्टार युवतींचाही या उत्सवात सहभाग राहणार आहे. हा दहीहंडी उत्सव सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. जळगावकरांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींच्या धाडसाला दाद द्यावी, असे आवाहन उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले.

या पत्रकार परिषदेला दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षा डॉ. सीमा पाटील, उपाध्यक्ष उषा जैन, स्वागत समितीच्या सदस्या रूपाली वाघ, डॉ. अनिता पाटील, हर्षाली चौधरी, सोनाली पाटील, मीनल जैन, हेमांक्षी वानखेडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावदहीहंडी २०२६नारीशक्तीमहिला गोविंदा पथकयुवतींची दहीहंडीशिवतीर्थ मैदान
Previous Post

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif