• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप; आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याच्या मागणीवरून तणाव — अश्रुधुराच्या नळकांड्या आणि सौम्य लाठीमाराने परिस्थिती नियंत्रणात

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 3, 2026
in जळगाव, Uncategorized, क्राईम
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

बोदवड – तालुक्यातील जामठी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून एका खासगी क्लासच्या शिक्षकाविरोधात संताप व्यक्त करत शेकडो नागरिकांचा जमाव आक्रमक झाला. संशयित शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही जमाव शांत झाला नाही. संतप्त नागरिकांनी शिक्षकाची कार पेटवून दिली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यातून स्वतःच्या ताब्यात देण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.

 

जामठी येथील एका खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी शिक्षकाने गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बोदवड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले.

मात्र, पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतरही जमावाचा रोष कमी झाला नाही. मोठ्या संख्येने नागरिक संशयित शिक्षकाच्या घरासमोर जमा झाले. यावेळी जमावाने घरासमोर उभी असलेली त्याची कार पेटवून दिली.

यानंतर संशयित शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यातून जमावाच्या स्वाधीन करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत संशयिताला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमाव आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

परिस्थिती अधिक चिघळत असताना काही नागरिकांकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात न आल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. अखेर जमाव हळूहळू पांगला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त जामठी येथे दाखल झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून गावातील तणाव सध्या निवळला आहे.

या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संशयित शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास बोदवड पोलीस करीत आहेत.

 

बातमी शेअर करा !
Tags: अल्पवयीन मुलगीअश्लील वर्तनजळगावजामठीबोदवडशिक्षक
Previous Post

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

Next Post

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif