• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

धोकादायक इमारतीचा भाग कोसळून चारचाकी वाहन दबले ; नागरिकांचा जीव मुठीत!

महानगरपालिका प्रशासनाकडून तातडीने कारवाईची नागरिकांची मागणी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 1, 2026
in जळगाव, ब्रेकिंग, महापालिका
धोकादायक इमारतीचा भाग कोसळून चारचाकी वाहन दबले ; नागरिकांचा जीव मुठीत!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव :  रथ चौक राम मंदिर परिसरातील गेल्या दोन वर्षापूर्वी महापालिकेने धोकेदायक इमारत पाडले होते मात्र तिचा अंशतः काही भाग तसाच राहिला होता. त्यातला काही भाग मध्यरात्री कोसळल्याने या ठिकाणी लावण्यात आलेल्या चार चाकी वाहनाचा मोठे प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. यापूर्वी अनेक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या मात्र यावर  प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने ही घटना घडल्याचे  बोलले जात आहे . तसेच या परिसरात महानगरपालिकेची शालेय इमारत आहे ती देखील पूर्णता जीर्ण झाली आहे.शाळेसह आजूबाजूच्या अनेक इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संबंधित इमारतीबाबत यापूर्वीही महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. व जीर्ण इमारतीचा काही भाग मध्यरात्री अचानक कोसळल्याने खाली उभ्या असलेल्या रत्नेश निकम यांच्या  चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

रथ चौक परिसरातील महानगरपालिका शाळेसह आजूबाजूच्या अनेक इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संबंधित इमारतीबाबत यापूर्वीही महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

 

घटनेनंतर परिसरातील नागरिक आक्रमक झाले असून संबंधित धोकादायक इमारतीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.

 

दरम्यान, ही जीर्ण इमारत हरिश्चंद्र भोजू बर्डे यांची असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ते काही वर्षांपासून पुणे येथे वास्तव्यास आहेत. शेजारील नागरिकांनी इमारतीला तडे गेल्याची माहिती देत लक्ष देण्याची विनंती केली होती. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

इमारतीच्या काही भिंतींची पडझड झाली असून मोठमोठे तडे गेले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही इमारत कधीही पूर्णपणे कोसळू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: इमारतकोसळलीजळगावजीर्णइमारतधोकादायकइमारतमहानगरपालिकारथचौक
Previous Post

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

Next Post

जळगाव महापालिकेतील ‘भूसंपादन घोटाळा’ अधिवेशनात गाजला!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव महापालिकेतील ‘भूसंपादन घोटाळा’ अधिवेशनात गाजला!

जळगाव महापालिकेतील ‘भूसंपादन घोटाळा’ अधिवेशनात गाजला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif