• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 30, 2026
in जळगाव, शैक्षणिक
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव– राष्ट्रभक्ती, एकात्मता आणि संगीताच्या माध्यमातून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणारा ‘युनिटी इन पॅट्रियोटिझम – एक भारत… एक सूर…’ हा विशेष देशभक्तीपर कार्यक्रम आज ( दि. ३० जून) सकाळी ८ वाजता, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे आयोजित केला होता. याप्रसंगी महापौर दीपमाला काळे, एनसीसीचे कमांडीग ऑफीसर धिरज मिनोत्रा, कॅप्टन मोहन कुलकर्णी, ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई, डाॅ. अश्विन झाला, रोटरी क्लब जळगाव अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मुख्याध्यापक संघटनेचे राज्यअध्यक्ष जे. के. पाटील, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, प्रकल्प प्रमुख ॲड. सागर चित्रे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सहभागी शाळांचा सम्मान करण्यात आला.

 

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड प्रायोजित व रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात देशभक्तिपर गीतांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला गेला. ‘स्वरांतून राष्ट्रप्रेम, गीतांतून एकात्मता’ ही संकल्पनेतून १६ शाळेतील १०००वर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गितांचे सादरीकरण केले. १५० वर्षांचा वारसा असलेल्या वंदे मातरम्… या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माणसाने माणसाशी माणसासम.. हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे… यातुन माणुसकीचा जागर झाला. साने गुरुजींच्या खरा तो एकचि धर्म… झेंडा ऊंचा रहे हमारा.. या झेंडा गितानंतर राष्ट्रगीत जन गण मन.. ने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमाला विद्यार्थी, युवक, शिक्षक, मुख्याध्यापक, रोटरी सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रभक्तीचा अनोखा सांगितीक अनुभव जळगावकरांना आला. अब्दुलभाई यांनी घोषणा देऊन देशभक्तिपर वातावरण निर्मिती केली. रोटरी क्लब जळगाव अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी संचालन केले.

*सहभागी शाळांचे झाले कौतुक..*

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल, ए. टी.झांबरे, झि. तो. महाजन विद्यालय, धानोरा, श्रीमती शेवंताबाई टोके विद्यालय, नंदिनीबाई मुलींचे विद्यालय, श्रीराम विद्यालय मेहरूण, जिजामाता विद्यालय, या. दे. पाटील विद्यालय, बाहेती विद्यालय, जय दुर्गा विद्यालय, शंकुतला जे विद्यालय, पी. के. गुळवे विद्यालय , जे. जे. पंडित हायस्कूल,लोहारा ता. पाचोरा या शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभागाबद्दल सम्मान करण्यात आला.

*प्रत्येक कृती देशप्रेम ठरावी – धिरज मिनोत्रा*

धिरज मिनोत्रा यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आईवडिलांचा प्रत्येकाने आदर्श ठेवावा, स्वच्छता असो की आपण करत असलेली कुठल्याही सामान्य कृतीमधून देशप्रेमाला प्राधान्य क्रम दिला पाहिजे. यासाठी बाजारात जाताना प्लास्टिकच्या पिशवीचा वापर कमी करून आपला देश स्वच्छ सुंदर ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले.

स्वच्छता, शिस्तीतुन देशभक्तीची प्रेरणा – दीपमाला काळे

गांधी रिसर्च फाउंडेशन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमातुन शिस्त, स्वच्छता आणि वृक्षारोपणाचा संदेश विद्यार्थ्यांनी घ्यावा. समूहशक्तीतुन शहराला सुंदर शहर करावे यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, ती वाढवावी व जतन करावी. बालवयात जे संस्कार पेरली जातात तिच भविष्यात सामाजिक स्तरावर कामी येतात.

फोटो कॅप्शन – एक भारत.. एक सुरात देशभक्तीपर गीत सादर करताना हजारो विद्यार्थी

बातमी शेअर करा !
Tags: एकभारतएकसुरगांधीरिसर्चफाउंडेशनजळगावदेशभक्तीराष्ट्रीयऐक्यरोटरीक्लबजळगाव
Previous Post

मोहाडी अतिक्रमण प्रकरणात लोक संघर्ष मोर्चाला धक्का!

Next Post

धोकादायक इमारतीचा भाग कोसळून चारचाकी वाहन दबले ; नागरिकांचा जीव मुठीत!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
धोकादायक इमारतीचा भाग कोसळून चारचाकी वाहन दबले ; नागरिकांचा जीव मुठीत!

धोकादायक इमारतीचा भाग कोसळून चारचाकी वाहन दबले ; नागरिकांचा जीव मुठीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif