• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मोहाडी अतिक्रमण प्रकरणात लोक संघर्ष मोर्चाला धक्का!

मोहाडी अतिक्रमण हटविण्याविरोधातील लोक संघर्ष मोर्चाचा दावा न्यायालयाने फेटाळला; मनपाची कारवाई कायदेशीर असल्याचे निरीक्षण

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 29, 2026
in जळगाव, न्यायालयातून
मोहाडी अतिक्रमण प्रकरणात लोक संघर्ष मोर्चाला धक्का!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : मोहाडी येथील महानगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईविरोधात दाखल करण्यात आलेला लोक संघर्ष मोर्चाचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जळगाव येथील ४थे संयुक्त दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश सोमवार (२९ जून) दिला.

लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने गणेश नीलकंठ सूर्यवंशी यांनी प्रतिनिधी स्वरूपात दावा दाखल केला होता. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, मोहाडी येथील गट नं. ६० मधील सुमारे २ हेक्टर ८० आर क्षेत्रफळाच्या जमिनीवर भिल समाजातील गरीब व मागासवर्गीय कुटुंबे २००९ पासून तात्पुरत्या झोपड्या उभारून वास्तव्यास आहेत.

फिर्यादींकडून न्यायालयात असा दावा करण्यात आला की, संबंधित जमीन मूळतः कंपोस्ट डेपो व बीफ मार्केटसाठी संपादित करण्यात आली होती. मात्र आता ती व्यावसायिक कारणासाठी वापरण्याचा प्रयत्न सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने दिलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा बेकायदेशीर आहेत.

दरम्यान, जळगाव महानगरपालिकेने न्यायालयात जोरदार बाजू मांडताना संबंधित रहिवासी हे अतिक्रमणकर्ते असल्याचे सांगितले. एमआरटीपी कायद्याच्या कलम ५५ अंतर्गत नियमानुसार नोटिसा देण्यात आल्याचा दावा मनपाने केला. तसेच एमआरटीपी कायद्याच्या कलम १४९ नुसार अशा प्रकारचा दिवाणी दावा ग्राह्य धरता येत नसल्याचेही मनपाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

न्यायालयाने सुनावणीदरम्यान महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. फिर्यादींनी सादर केलेल्या दस्तऐवजांवरूनच संबंधित जमीन महानगरपालिकेच्या मालकीची असल्याचे स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. ग्रामपंचायतीच्या अधिकारक्षेत्राचा कोणताही ठोस पुरावा फिर्यादींकडून सादर करण्यात आलेला नसल्याचेही आदेशात म्हटले आहे.

तसेच महानगरपालिकेने सादर केलेल्या Google imagery वरून अतिक्रमण २०२२-२३ दरम्यान वाढल्याचे दिसून येत असल्याचे न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले.

न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, संबंधित रहिवाशांबाबत सहानुभूती असली तरी त्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसांना दिवाणी दाव्याद्वारे आव्हान देता येत नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने लोक संघर्ष मोर्चाचा दावा फेटाळून लावला.

अखेर न्यायालयाने महानगरपालिकेचा अर्ज मंजूर करत संपूर्ण प्रकरण निकाली काढले.

बातमी शेअर करा !
Tags: अतिक्रमणजळगावजळगाव महानगरपालिकामोर्चामोहाडीलोक संघर्ष
Previous Post

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

Next Post

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत... एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif