• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

जैन इरिगेशनतर्फे वारकऱ्यांचे स्वागत; पालखी पूजन, अल्पोपहार आणि वाहन सेवेची परंपरा यंदाही कायम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 30, 2026
in जळगाव ग्रामीण, Uncategorized, पंढरपूर दिंडी
संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगाव सुवर्णनगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानच्या श्री संत मुक्ताबाई रामपालखी आणि दीड शतकी पंढरपूरकडे पायीवारी निघाली. जळगाव ते पंढरपूर पायीवारीचे वारीचे स्वागत जैन हिल्सच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ करण्यात आले. अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. तर जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी विजय मुथा पालखीचे पूजन आणि वारकरींचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी एस. बी. ठाकरे, चंद्रकांत चौधरी, भिमराव दांडगे, किशोर पाटील यांनी श्रीराम मंदिर संस्थान (आप्पा महाराज समाधी मंदिर) चे विद्यमान गादीपती मंगेश महाराज यांची सेवा केली.

 

जैन इरिगेशन सिस्टीम्स कंपनीने या यात्रेबरोबर संत मुक्ताबाईंच्या श्रीराम पालखीबरोबर मदत म्हणून एक मालवाहू वाहन तसेच सजावट केलेल्या प्रवासी वाहनाची उपलब्धता दर वर्षी करण्यात येत असते, हे वाहन वारकऱ्यांसोबतच पंढरपूर येथे जात असते. या पालखीची स्थापना १७९४ मध्ये झाली तेव्हापासून अखंडपणे हा पालखी सोहळा होत असतो. दरवर्षी ही वारी जात असताना जैन हिल्स येथे आदरातिथ्य स्वीकारून पुढे मार्गस्थ होते. यावेळी ह.भ.प. श्रीराम महाराज यांच्यासह शेकडो वारकऱ्यांसोबत पालखीचे पंढरपूरकडे पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाले.

 

जैन हिल्सच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ जी. आर. पाटील, मनोहर बागुल, सुनील खैरनार, अभिजीत शुक्ला, नितीन चोपडा, श्रेयेस कुमट यांच्यासह श्रीराम मंदीर संस्थचे विश्वस्त मंडळी उपस्थित होते. जैन इरिगेशनतर्फे वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांना अल्पोहार वाटप करण्यात आले. दिंडीच्या स्वागतासाठी जैन इरिगेशनच्या मानव संसाधन विभाग, सुरक्षा विभाग, राजभोज खानपान विभागातील सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

फोटो कॅप्शन  – संत मुक्ताबाईंच्या श्रीराम पालखीचे जैन हिल्सच्या गेटवर पादुकांचे दर्शन घेताना (इनसेटमध्ये) सौ. निशा जैन, वारीमध्ये सहभागी ह.भ.प मंगेश महाराज, श्रीराम महाराज व वारीकरी.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजैन इरिगेशनजैन हिल्सपंढरपूर वारीवारकरी संप्रदायसंत मुक्ताबाई रामपालखी
Previous Post

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३० चोरीच्या मोटारसायकलींसह टोळी जेरबंद!

Next Post

मोहाडी अतिक्रमण प्रकरणात लोक संघर्ष मोर्चाला धक्का!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मोहाडी अतिक्रमण प्रकरणात लोक संघर्ष मोर्चाला धक्का!

मोहाडी अतिक्रमण प्रकरणात लोक संघर्ष मोर्चाला धक्का!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif