• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; NEET नंतर TET प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी ही विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी गंभीर बाब; NEET नंतर TET प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 28, 2026
in जळगाव, शैक्षणिक
स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; NEET नंतर TET प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया असलेल्या स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता आज गंभीर संकटात सापडली आहे. NEET-UG २०२६ परीक्षेतील गैरप्रकार, परीक्षा रद्द करणे आणि पुनर्परीक्षा घेण्याची वेळ आल्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या आरोपांनी राज्यातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप व अस्वस्थता निर्माण केली आहे.

NEET-UG २०२६ परीक्षेसाठी देशभरातील सुमारे २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले. अनेक कुटुंबांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले, कर्ज काढले, आयुष्यभराची बचत खर्च केली. मात्र पेपरफुटीच्या संशयामुळे परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्याची वेळ येणे, ही केवळ प्रशासकीय चूक नसून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे.

विशेष म्हणजे २०२४ मधील NEET वादानंतर परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा केल्या जातील, अशी अपेक्षा देशभरातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही २०२६ मध्ये पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होणे हे सुरक्षा व्यवस्थेचे, प्रशासनाचे, पारदर्शकतेचे आणि उत्तरदायित्वाचे अपयश अधोरेखित करते.

याच पार्श्वभूमीवर राज्यातील TET परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणारे ग्रामीण, मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या परिश्रमावर पाणी फेरणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही शासनाकडे पुढील मागण्या करीत आहोत –

• TET पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

• दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी आणि त्यामागील संपूर्ण साखळी जनतेसमोर आणण्यात यावी.

• राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्याधुनिक, तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक व सुरक्षित यंत्रणा उभारण्यात यावी.

• परीक्षा रद्द होणे अथवा पुनर्परीक्षा घेण्यामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक व आर्थिक परिणामांचा अभ्यास करून आवश्यक सहाय्य व्यवस्था निर्माण करण्यात यावी.

• परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीचे नियमित स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे.

एक विद्यार्थी दोन-दोन वर्षे अभ्यास करतो, पालक कष्टाची कमाई खर्च करतात, अनेक माता दागिने विकतात, वडील कर्ज घेतात आणि संपूर्ण कुटुंब आपल्या मुलांच्या यशाची स्वप्ने पाहते. मात्र एका पेपरफुटीमुळे अथवा प्रशासकीय निष्काळजीपणामुळे त्या कुटुंबाचे संपूर्ण स्वप्न उद्ध्वस्त होणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे, परिश्रमाचे आणि समान संधीच्या तत्त्वाचे रक्षण करणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि गुणवत्तेचे संरक्षण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सातत्याने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहील.

या पत्रकार परिषदेस जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री. जामील शेख, श्री. मनोज वाणि, श्री. कफ़ील अहमद, युवक काँग्रेसचे सदस्य श्री. अनंत पाटील, मुक्ताईनगर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष श्री. चेतन झांके तसेच एनएसयूआयचे श्री. विवेक सपकाळे उपस्थित होते.

– धनंजय शिरीष चौधरी

जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

जळगाव पूर्व जिल्हा (रावेर लोकसभा क्षेत्र)

बातमी शेअर करा !
Tags: काँग्रेसजळगावटीईटीपेपरफुटीनीटपेपरफुटीविद्यार्थीस्पर्धापरीक्षा
Previous Post

रिंगरोड रस्त्याचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन!

Next Post

सीलबंद घरात मध्यरात्रीची घुसखोरी! 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
सीलबंद घरात मध्यरात्रीची घुसखोरी! 

सीलबंद घरात मध्यरात्रीची घुसखोरी! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif