• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

सीलबंद घरात मध्यरात्रीची घुसखोरी! 

एसीबी कारवाईतील मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी दोन नातेवाईक पकडले

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 28, 2026
in जळगाव, क्राईम
सीलबंद घरात मध्यरात्रीची घुसखोरी! 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : अकोला एसीबीच्या भ्रष्टाचार कारवाईनंतर सीलबंद करण्यात आलेल्या सह जिल्हा निबंधक किरण चौधरी यांच्या जळगावातील घरात संशयास्पदरीत्या प्रवेश करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. घराचे कुलूप तोडून मागील बाजूने शिडीच्या सहाय्याने आत शिरणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली असून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता का? याचा तपास आता वेगाने सुरू झाला आहे.

अकोला एसीबीने काही दिवसांपूर्वी किरण चौधरी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली होती. त्यानंतर जळगावातील गणेश कॉलनी परिसरातील साईप्रभा आर्केडमधील त्यांच्या राहत्या घराची तपासणी सुरू असल्याने एसीबीच्या पथकाने सदर घर सीलबंद केले होते.

दरम्यान शनिवारी उशिरा रात्री घरातून संशयास्पद हालचाली आणि आवाज येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ याची माहिती एसीबी अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी पाहणी केली असता घराच्या मागील बाजूने शिडी लावून दोन व्यक्तींनी घरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. चॅनल गेटचे कुलूप तोडण्यात आल्याचेही समोर आले. पोलिसांनी दोघांनाही जागीच पकडून ताब्यात घेतले.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या जळगाव विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता वसंत नवघरे यांनी फिर्याद दिली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रसाद वसंत नारखेडे (रा. डांभुर्णी, ता. यावल) आणि प्रवीण अशोक महाजन (रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे दोघे किरण चौधरी यांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सीलबंद घरात प्रवेश करण्यामागे नेमका उद्देश काय होता, घरातील कागदपत्रे, रोकड किंवा तपासासाठी महत्त्वाचे पुरावे हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता का, तसेच हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला, याचा आता एसीबी आणि पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातमी शेअर करा !
Tags: एसीबीकिरण चौधरीघुसखोरीजळगावभ्रष्टाचार प्रकरणसीलबंदघर
Previous Post

स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; NEET नंतर TET प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Next Post

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif