• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महायुतीत तणाव ; विधानपरिषद शिवसेना लढण्याच्या तयारीत!

आमदार मुंबईकडे रवाना ; जागा द्या अन्यथा लढू द्या उपमुख्यमंत्र्यांना घालणार साकडे!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 26, 2026
in जळगाव, राजकारण, विधान परिषद निवडणूक - 2026
महायुतीत तणाव ; विधानपरिषद शिवसेना लढण्याच्या तयारीत!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेना आता ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सोमवारी सायंकाळी जळगावातील एका खास बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, “जागा द्या… अन्यथा आम्हाला लढू द्या,” अशी स्पष्ट भूमिका मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महायुतीच्या जागावाटपात जळगावची जागा अद्याप निश्चित न झाल्याने शिवसेनेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख आमदार व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना विधान परिषद निवडणूक लढवण्यास पूर्णपणे तयार असल्याचे एकमताने ठरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

बैठकीनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख विलास लांडे, आमदार किशोर पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची सविस्तर माहिती देण्यात येणार असून, जळगावची जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी जोरदार आग्रह धरण्यात येणार आहे.

दरम्यान, जागावाटपात शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न झाल्यास ‘मैत्रीपूर्ण लढत’ करण्याचा पर्यायही चर्चेत असल्याने महायुतीत अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता मुंबईतील बैठकीनंतर वरिष्ठ नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: एकनाथ_शिंदेगुलाबराव_पाटीलजळगाव_राजकारणमहायुतीमहायुतीत_तणावविधानपरिषदशिवसेना
Previous Post

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

Next Post

अर्ज विक्रीत मोठी चुरस; नावांबाबत प्रशासनाची मौन भूमिका

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

अर्ज विक्रीत मोठी चुरस; नावांबाबत प्रशासनाची मौन भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif