• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी पेलले आव्हान

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 27, 2026
in Uncategorized, आरोग्य, जळगाव
वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : हृदयविकाराचा त्रास असलेल्या २२ वर्षीय गर्भवती महिलेची अतिजोखमीची प्रसूती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली. स्त्रीरोग तज्ज्ञ, हृदयविकार तज्ज्ञ, मेडिसीन विभाग तसेच बालरोग तज्ज्ञ यांच्या समन्वयातून आई आणि बाळाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या यशस्वी उपचारामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, वरणगाव येथील निकीता नामक २२ वर्षीय महिला दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रसूतीसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र तिला यापूर्वीपासूनच हृदयविकाराचा गंभीर त्रास असल्याने तिची प्रसूती अतिजोखमीची मानली जात होती. गर्भधारणेदरम्यान हृदयावर अतिरिक्त ताण येत असल्याने आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे रुग्णालयातील स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी तिची तपासणी केली. तसेच विशेष दक्षता घेत तातडीने हृदयविकार तज्ज्ञ आणि मेडिसीन तज्ज्ञांचा अभिप्राय घेतला.

 

 

तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलेची विविध तपासण्या करून तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले. प्रसूतीदरम्यान हृदयाची गती, रक्तदाब आणि ऑक्सिजनचे प्रमाण सतत तपासण्यात आले. अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्यासह डॉ. ऐश्वर्या चलवदे, डॉ. संस्कृती भिरूड, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल फेगडे या टीमने ही अतिजोखमीची प्रसूती सुरक्षितपणे पार पडली. प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती लक्षात घेता तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि मेडिसीन विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली तिच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले. नवजात शिशुलाही आवश्यक उपचार आणि निरीक्षणासाठी बालरोग विभागात दाखल करण्यात आले. सध्या आई आणि बाळाची प्रकृती समाधानकारक आहे.

 

हृदयविकार असलेल्या गर्भवती महिलांची प्रसूती ही नेहमीच मोठे आव्हान असते. अशा रुग्णांमध्ये प्रसूतीदरम्यान हृदयावर ताण वाढण्याचा धोका असतो. मात्र सर्व विभागांच्या समन्वयातून आणि योग्य नियोजनामुळे ही प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. वेळेवर उपचार आणि सतत निरीक्षण यामुळे आई आणि बाळ दोघांनाही सुरक्षित ठेवणे शक्य झाले.
– डॉ. ऐश्वर्या चलवदे, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

बातमी शेअर करा !
Tags: अतिजोखमीची_प्रसूतीजळगावडॉ_उल्हास_पाटील_रुग्णालयवैद्यकीय_यशसुरक्षित_प्रसूतीहृदयविकारग्रस्त_गर्भवती
Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा!

Next Post

महायुतीत तणाव ; विधानपरिषद शिवसेना लढण्याच्या तयारीत!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महायुतीत तणाव ; विधानपरिषद शिवसेना लढण्याच्या तयारीत!

महायुतीत तणाव ; विधानपरिषद शिवसेना लढण्याच्या तयारीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif