• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

शस्त्रनिर्मितीच्या जाळ्यावर मोठा घाव अंतरराज्यीय 'ऑपरेशन कॉम्बिंग'.विशेष मोहिमेचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 21, 2026
in जळगाव, क्राईम
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  :  फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्रनिर्मिती व शस्त्रतस्करीवर प्रभावी आळा घालण्याच्या उद्देशाने जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील पार उमरटी (ता. वरला) येथे आंतरराज्यीय ‘ऑपरेशन कॉम्बिंग’ यशस्वीरीत्या राबवले. या कारवाईमुळे अवैध शस्त्रनिर्मिती व तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात करण्यात आला आहे.

 

चोपडा शहर, चोपडा ग्रामीण आणि नाशिक ग्रामीणमधील पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांतील फरार व संशयित आरोपींच्या शोधासाठी २१ जुलै रोजी मध्यरात्री पथके रवाना झाली.

 

विशेष मोहिमेचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले.

पहाटे १ ते सकाळी ८ या वेळेत पार उमरटी परिसरात व्यापक शोधमोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. मोहिमेत जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलीस दलातील विविध अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, विशेष शाखा तसेच ४०० हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि २० शासकीय वाहनांचा ताफा सहभागी झाला होता.

 

कारवाईदरम्यान ४५ संशयित घरांची झडती, २० व्यक्तींची सखोल चौकशी आणि १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने २ देशी कट्टे आणि ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच ३२ संशयित महाराष्ट्र पासिंग मोटारसायकली, देशी कट्टे तयार करण्यासाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणातील कच्चा माल, साचे आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले.

याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने २७ फरार व संशयित आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंग करण्यात आले असून, पुढील तपासासाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलिसांच्या समन्वयातून झालेल्या या कारवाईमुळे अवैध शस्त्रनिर्मिती व तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात झाला असून संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दरम्यान, जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रे, संघटित गुन्हेगारी आणि फरार आरोपींविरुद्ध कठोर कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे सांगत, नागरिकांनीही संशयास्पद हालचाली किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: ऑपरेशन कॉम्बिंगजळगाव पोलीसधुळे पोलीसनाशिक ग्रामीण पोलीसबडवानीमध्यप्रदेश
Previous Post

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

Next Post

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif