• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून पर्यावरणाचा संदेश..

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 20, 2026
in जळगाव, उपक्रम, शैक्षणिक
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : एखाद्या मुलाच्या हातात मातीचा छोटासा गोळा असतो, पण त्या गोळ्यात दडलेले असते उद्याचे हिरवेगार जंगल. अनुभूती बालनिकेतन मॉन्टेसरी व अनुभूती विद्या निकेतन येथे दि. १३ ते १८ जुलै दरम्यान “अनुभूती ट्री फेस्टिव्हल” साजरा करण्यात आला. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सीड बॉल (बीजगोळे) तयार करत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला. माती, सेंद्रिय खत आणि स्थानिक वृक्षांच्या बियांचा वापर करून तयार होणारे सीड बॉल विद्यार्थ्यांसाठी केवळ एक उपक्रम नव्हते, तर निसर्गाशी नवे नाते जोडणारा अनुभव ठरला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता, हातात माती आणि मनात हिरवे भविष्य घडविण्याचे स्वप्न दिसत होते.

जैन इरिगेशन चे सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, अनुभूती स्कुलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, अंबिका जैन यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या संकल्पनेला प्राचार्य मनोज परमार यांच्यासह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कृतीची जोड दिल्याने विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम संस्मरणीय ठरला.

जैन इरिगेशनचे गार्डन विभागाचे अजय काळे, गिरीष जगताप, पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, मयूर देशमूख तसेच सर्व ताई-दादांनी विद्यार्थ्यांना सीड बॉल तयार करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. विद्यार्थ्यांना देशी वृक्षांच्या बिया, माती आणि नैसर्गिक खताचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने सीड बॉल तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सीड बॉल तयार केले. हे सीड बॉल पावसाळ्यात विविध ठिकाणी टाकून, त्याद्वारे हरित क्षेत्र वाढविणे, नैसर्गिक वनस्पतींचे पुनरुज्जीवन आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

समारोप कार्यक्रमात संचालिका अंबिका जैन यांनी विद्यार्थ्यांना सीड बॉलचे वितरण केले. यावेळी अंबिका जैन बोलताना म्हणाले की, ‘हॅण्ड, हार्ड आणि हेड याद्वारे निर्माण झालेली सीड बॉल हे निसर्गाशी जुळणारी कृती आहे. कारण त्यांनी स्वत: ते केले आहे. वनसंवर्धन, वन्यजीवांचे संरक्षण आणि निसर्गाप्रती संवेदनशीलतेचा यातून संदेश जातो. विद्यार्थ्यांना ‘ग्रीन अम्बेसेडर’ बनून अधिकाधिक झाडे लावण्याचे, त्यांचे संगोपन करण्याचे आणि पर्यावरण संरक्षणाला आपल्या जीवनाचा भाग बनविले पाहिजे.

खेळता-खेळता मुलांनी बीजसंवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश आत्मसात केला. वर्गखोल्यांबाहेर घडलेला हा उपक्रम मुलांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरला. सीड बॉल पावसाळ्यात डोंगराळ, दुर्गम आणि ओसाड भागात फेकल्यास योग्य वातावरण मिळाल्यावर त्यातून रोपे उगवतात आणि नैसर्गिकरीत्या हरितक्षेत्र वाढण्यास मदत होते. ही संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगण्यात आली. त्यामुळे पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, याची जाणीव लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात रुजल्याचे प्राचार्य मनोज परमार म्हणाले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी हातात सीड बॉल घेत “झाडे लावू, झाडे जगवू आणि पर्यावरण वाचवू” अशी सामूहिक प्रतिज्ञा केली. या निरागस हातांनी तयार केलेले बीजगोळे उद्या हजारो वृक्षांचे रूप धारण करतील, अशी आशा व्यक्त करत ‘अनुभूती ट्री फेस्टिव्हल’ ने पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविला.

बातमी शेअर करा !
Tags: अनुभूती ट्री फेस्टिव्हलपर्यावरणपर्यावरण संवर्धनवृक्षारोपणसीड बॉलहरित भविष्य
Previous Post

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

Next Post

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif