• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

डॉ. निलेश किनगे व त्यांच्या टीमची अत्याधुनिक न्यूरो-इंटरव्हेन्शनल शस्त्रक्रिया; ओपन ब्रेन सर्जरीशिवाय रुग्णाला नवजीवन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 21, 2026
in जळगाव, आरोग्य
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : येथील अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटल अँड अँडव्हान्स्ड स्ट्रोक सेंटरमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर’ या तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूतील ‘अँन्युरिझम’ या अत्यंत गंभीर आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले. प्रसिद्ध इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. निलेश किनगे व त्यांच्या टीमने खानदेशात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाला नवजीवन दिले आहे.

रुग्णाला तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ‘एमआरआय’ आणि ‘डीएसए’ तपासणीदरम्यान रुग्णाच्या मेंदूतील मुख्य रक्तवाहिनीला मोठा फुगा (अँन्युरिझम) झाल्याचे निष्पन्न झाले. हा फुगा फुटल्यास मेंदूत तीव्र रक्तस्राव होऊन अर्धांगवायू किंवा जीवितास धोका निर्माण झाला असता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. निलेश किनगे यांनी कोणतेही ओपन ब्रेन सर्जरी न करता केवळ मांडीच्या धमनी द्वारे मेंदूत पोचून ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर स्टॅट बसवून’ यशस्वीरीत्या आधुनिक न्यूरो इंटरनॅशनल शस्त्रक्रिया केली.

 

अत्याधुनिक स्टेंटमुळे रक्ताचा प्रवाह फुग्यामध्ये न जाता थेट मुख्य रक्तवाहिनीतून सुरू झाला, ज्यामुळे अँन्युरिझमचा फुटून रक्तस्राव होण्याचा धोका पूर्णपणे टळला या उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे सुखरूप असून आज डिस्चार्ज देण्यात आला. या या पूर्ण प्रोसिजरमध्ये डॉक्टर विनोद किंनगे भूलतज्ञ यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

 

खान्देशातच अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय दर्जाची न्यूरो-इंटरव्हेंशनल सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना आता मुंबई, पुणे किंवा नागपूरसारख्या दूरच्या शहरांत जाण्याची गरज नाही, असे मत डॉ. निलेश किनगे यांनी व्यक्त केले. रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉ. किनगे व अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक आभार मानले

बातमी शेअर करा !
Tags: अँक्सॉन_ब्रेन_हॉस्पिटलजळगावडॉ_निलेश_किनगेफ्लो_डायव्हर्टरब्रेन_अँन्युरिझमसिल्क_व्हिस्टा
Previous Post

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

Next Post

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; 'ऑपरेशन कॉम्बिंग'मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif