• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

कर्करोगाशी झुंज… पण लोकसेवा कायम; खासदार स्मिताताई वाघ पुन्हा ‘संसदरत्न’

९६% उपस्थिती, २६९ प्रश्न, ५३ चर्चांमध्ये सहभाग; लोकसभेत अभ्यासू कामगिरीची दखल

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 25, 2026
in जळगाव, राजकारण
कर्करोगाशी झुंज… पण लोकसेवा कायम; खासदार स्मिताताई वाघ पुन्हा ‘संसदरत्न’
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्यLive न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या खासदार Smita Wagh यांना सलग दुसऱ्यांदा प्रतिष्ठेचा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेतील प्रभावी कामगिरी, लोकहिताच्या प्रश्नांवरील अभ्यासू मांडणी आणि संसदीय कामकाजातील सातत्यपूर्ण सक्रियतेची दखल घेत हा राष्ट्रीय सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

संसद रत्न पुरस्कार २०२६ साठी ज्युरी समितीने देशभरातील केवळ १० लोकसभा खासदार, २ राज्यसभा खासदार आणि संसदीय स्थायी समित्यांच्या ४ सदस्यांची निवड केली आहे. या मानाच्या यादीत जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह पुण्यातील मेधा कुलकर्णी या दोन महिला नेत्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही स्मिताताई वाघ यांनी लोकसेवेचा ध्यास कायम ठेवला. संसदेतील त्यांची उपस्थिती तब्बल ९६ टक्के राहिली असून त्यांनी २६९ प्रश्न उपस्थित करत विविध लोकहिताच्या विषयांना संसदेत वाचा फोडली.

याशिवाय ५३ चर्चांमध्ये सहभाग घेत मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे मांडले. तसेच ५ खासगी विधेयके सादर करत त्यांनी संसदीय कार्यात आपली अभ्यासू छाप उमटवली.गेल्या वर्षीही संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या स्मिताताई वाघ यांनी सलग दुसऱ्यांदा हा राष्ट्रीय सन्मान मिळवत जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर उंचावला आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगावखासदारसंसदरत्नसंसदरत्न२०२६स्मिताताईवाघस्मितावाघ
Previous Post

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव!

Next Post

पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ मधील मोठ्या ‘बाबा खोली’ नाल्याची स्वच्छता!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ मधील मोठ्या ‘बाबा खोली’ नाल्याची स्वच्छता!

पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ मधील मोठ्या ‘बाबा खोली’ नाल्याची स्वच्छता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif