• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ मधील मोठ्या ‘बाबा खोली’ नाल्याची स्वच्छता!

महापौरांच्या सूचनेनंतर आरोग्य विभागाची धडक मोहीम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 25, 2026
in जळगाव, महापालिका
पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ मधील मोठ्या ‘बाबा खोली’ नाल्याची स्वच्छता!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज

पावसाळा तोंडावर आलेला असताना शहरात ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील अत्यंत अडचणीच्या मानल्या जाणाऱ्या ‘बाबा खोली’ परिसरातील नाल्याची रविवारी (२४ मे) आरोग्य विभागातर्फे विशेष मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत सुमारे तीन ट्रॅक्टर इतका गाळ काढण्यात आला असून, नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर महापौरांचे आदेश

प्रभाग क्रमांक १५ मधील बाबा खोली नावाच्या नाल्याच्या दोन्ही बाजूंना दाट लोकवस्ती आणि घरे आहेत. त्यामुळे या नाल्याची साफसफाई करण्यासाठी अजिबात जागा शिल्लक नव्हती. पावसाळ्यात हा नाला तुंबून घरात पाणी शिरण्याची भीती असल्याने, स्थानिक नागरिकांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या समस्येची दखल घेत महापौरांनी तातडीने आरोग्य विभागाला या नाल्याची साफसफाई करण्याचे आदेश दिले होते.

६ तास चालली मोहीम; १ किमी अंतराचा गाळ काढला

महापौरांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने रविवारी सकाळी ७ वाजेपासूनच या परिसरात धडक मोहीम हाती घेतली. अत्यंत बिकट परिस्थिती आणि जागेची अडचण असतानाही, दुपारी १ वाजेपर्यंत तब्बल ६ तास सलग काम करण्यात आले. या मोहिमेत सुमारे १ किलोमीटर लांबीच्या या मोठ्या गटारीमधील साचलेला संपूर्ण गाळ आणि कचरा उपसण्यात आला. या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाचे सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, समीर बोरोले, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, रुपेश भालेराव, मंजू पवार यांच्यासह बीव्हीजी (BVG) कंपनीचे ठेकेदार आणि स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौरांकडून कामाची पाहणी

स्वच्छतेचे हे काम सुरू असताना स्वतः महापौर दीपमाला काळे यांनी बाबा खोली परिसरात भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत योग्य त्या सूचना दिल्या. या मोहिमेत तब्बल तीन ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला असून, पावसाळ्यापूर्वी नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून काही दिवसांनी पुन्हा एकदा या नाल्याची साफसफाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: आरोग्य विभागजळगावनाला_सफाईप्रभाग_१५बाबा_खोलीमहापौर दीपमाला काळेस्वच्छता मोहीम
Previous Post

कर्करोगाशी झुंज… पण लोकसेवा कायम; खासदार स्मिताताई वाघ पुन्हा ‘संसदरत्न’

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा!

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif