• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव!

छातीत असह्य वेदना, ९९ टक्के ब्लॉकेज; महादेव हॉस्पिटलच्या तत्पर उपचारांनी संपादकाला मिळाले नवजीवन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 24, 2026
in आरोग्य, जळगाव
एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : घाम खूप येतोय खांदा दुखतोय छातीत असह्य वेदना होत आहेत सकाळी साडेआठ वाजता आलेला हा फोन केवळ मदतीचा नव्हता, तर मृत्यूशी सुरू असलेल्या झुंजीचा आर्त आवाज होता. मात्र योग्य वेळी घेतलेला निर्णय, डॉक्टरांची तत्परता आणि महादेव हॉस्पिटलच्या सज्जतेमुळे एका संपादकाला अक्षरशः नवजीवन मिळाले.

शहरातील महादेव हॉस्पिटल येथे आयोजित हृदयविकार तपासणी शिबिरादरम्यान ही थरारक घटना घडली. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी यांच्या मोबाईलवर संपादक निलकंठ वाणी यांचा फोन आला. फोनवरील आवाज घाबरलेला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, खांदा आणि छातीत तीव्र वेदना सुरू होत्या.क्षणाचाही विलंब न करता राहुल कुलकर्णी यांनी ही गंभीर हृदयविकाराची लक्षणे असल्याचे ओळखले आणि तात्काळ महादेव हॉस्पिटलमध्ये या, असा सल्ला दिला. दुसरीकडे, रुग्णालयाचे प्रशासक एन. जी. चौधरी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवली.

 

रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचताच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सिद्धेश खांदे यांनी तातडीने ईसीजी केले. अहवाल पाहताच रुग्णाला गंभीर स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. रक्तदाब नियंत्रणात आल्यानंतर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये हृदयातील मुख्य रक्तवाहिनी ९९ टक्के ब्लॉक असल्याचे निदर्शनास आले.मृत्यू प्रत्येक क्षणी जवळ येत असताना डॉक्टरांनी वेळ न दवडता अँजिओप्लास्टी केली आणि यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन मिळाले. विशेष म्हणजे, त्या वेळी रुग्णाच्या खिशात एक रुपयाही नव्हता. मात्र शासन योजनेचा लाभ मिळवून देत संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले.रुग्णाच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. जर काही मिनिटे उशीर झाला असता, तर आज चित्र वेगळे असते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या प्रसंगानंतर निलकंठ वाणी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, असं म्हणतात डॉक्टर हे देवाचं रूप असतं. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने डॉक्टर देवदूत बनून आले आणि माझा जीव वाचवला. त्या सर्व डॉक्टरांचे आणि महादेव हॉस्पिटलचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणण्यात कोणताही विलंब झाला नाही, हीच त्याच्या जीव वाचण्यामागची सर्वात मोठी गोष्ट ठरली. छातीत वेदना, जास्त घाम येणे आणि खांद्यात दुखणे ही हृदयविकाराच्या झटक्याची महत्त्वाची लक्षणे आहेत. ईसीजीमध्ये गंभीर हृदयविकाराचा झटका स्पष्ट झाला होता. अँजिओग्राफीमध्ये हृदयातील मुख्य रक्तवाहिनी ९९ टक्के ब्लॉक असल्याचे दिसून आले. तातडीने अँजिओप्लास्टी करून रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला आणि रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.- डॉ. सिद्धेश खांदे, हृदयरोगतज्ज्ञ

 

बातमी शेअर करा !
Tags: #अँजिओप्लास्टीजळगाव_बातमीडॉ_सिद्धेश_खांदेनिलकंठ_वाणीमहादेव हॉस्पिटलहृदयविकाराचा_झटका
Previous Post

शेरी ग्रामपंचायतला “राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार २०२६” चा बहुमान!

Next Post

कर्करोगाशी झुंज… पण लोकसेवा कायम; खासदार स्मिताताई वाघ पुन्हा ‘संसदरत्न’

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
कर्करोगाशी झुंज… पण लोकसेवा कायम; खासदार स्मिताताई वाघ पुन्हा ‘संसदरत्न’

कर्करोगाशी झुंज… पण लोकसेवा कायम; खासदार स्मिताताई वाघ पुन्हा ‘संसदरत्न’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif