• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आपत्ती

डॉक्टरांचे भवितव्य घडवणारी परीक्षा ऑफलाइन का?

NEET चांगली दिल्याचा आनंद,साजरा करत असतांनाच, परीक्षा रद्दचा निरोप: विद्यार्थ्यांना अश्रू अनावर, टीचरही रडल्या!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 12, 2026
in आपत्ती, जळगाव, विशेष बातमी
डॉक्टरांचे भवितव्य घडवणारी परीक्षा ऑफलाइन का?
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव प्रतिनिधी – नीट परीक्षा दिल्यानंतर  पेपर चांगले गेले असल्याने  720 पैकी 652 गुणाचा पेपर लिहिण्याचा आनंद    कॅडबरी खाऊन साजरा करत असतांनाच, नीट परीक्षा रद्द झाल्याचे कळताच, क्षणार्धाच आनंद दुःखद बदलला, विद्यार्थीसह टीचरही ढसाढसा रडल्या. हा क्षण विद्यार्थ्यांसाठी खूपच वेदनादनदायी ठरला आहे.

डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप वेदनादायी प्रसंगातून जावं लागत आहे. रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करत परीक्षा दिली होती. व त्यात अपेक्षेप्रमाणे चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परंतु पेपर फुटीच्या कारणाने रद्द झालेल्या या नीट परीक्षेमुळे विद्यार्थी खचलेला आहे.

 

जेईई, ऍडव्हान्स सीईटी IIT यासारख्या परीक्षा ऑनलाईन होतात.मग वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली ही नीट परीक्षा ऑफलाइन का?

गेल्या दोन वर्षांपूर्वी 2024 मध्ये याआधी देखील नीट परीक्षा चा पेपर फुटला होता. त्यावेळी शंभर विद्यार्थी 720 पैकी 720 गुणाने उत्तीर्ण झाले होते. व त्याच पद्धतीची पुनःनावृत्ती 3 मे रोजी.झाली आहे. या परीक्षेत 200 प्रश्न एका प्रायव्हेट 200 प्रश्न अंदाजे दिले होते त्याप्रमाणे तसेच त्यापैकी एक पासून सिरीयल प्रश्न जशीच्या तशी पडले होते. परीक्षानंतर ही बाब उघड झाल्यानंतर यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागल्या. मात्र केंद्राने ही परीक्षा निकाल लागल्यानंतर रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

 

आम्ही  विद्यार्थ्यांना परीक्षा चांगली गेल्याने  विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत होतो. त्यांना कॅडबरीचा घास भरून आनंद साजरा करत होतो. व त्याच दरम्यान परीक्षा रद्द झाल्याचा निरोप आल्याने, आमचा आनंद क्षणातच पाण्यात विरून गेला. मुलांनी रात्र दिवस करून अभ्यास करून खात्रीशीर गुण मिळतील अशी तयारी केली होती. परंतु परीक्षा रद्द झाल्याने मुलांना अश्रू अनावर झाले व आम्ही सगळे या प्रसंगाने खचून गेलो आहोत. पुन्हा विद्यार्थ्यांचे मनोबल तयार करावे लागेल. जेईई -सीईटी ऍडव्हान्स परीक्षा ऑनलाईन होतात. मात्र डॉक्टरांचे भवितव्य ठरणाऱ्या,महत्त्वाची नीट या परीक्षा ऑफलाइन का होतात. ह्या परीक्षादेखील ऑनलाईन झाल्या पाहिजेत जेणेकरून हुशार विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही.

                                                   – प्रा.सविता वाणी 

                                                 जयीष्णू IIT गुरुकुल 

                                                         जळगाव.

 

नीट परीक्षा ऑनलाईन घेतल्यास यात पारदर्शकता येईल व ज्यावेळी पेपर लिक होतो, असे जरी कळले तरी सरकारचे इंटेलिजन्स हे तात्काळ पेपर चेंज करून करू शकतात. माझा मुलगा लातूरला दोन वर्षापासून मेहनत घेत आहे.परीक्षा आटोपल्यानंतर थोडा त्यांना तणाव मुक्त करण्यासाठी तो केदारनाथला गेला. परंतु आज नीट परीक्षा रद्द झाल्याचे ऐकून धक्का बसला. आता त्याला पुन्हा लातूरला जावे लागणार त्याच्यामुळे किती भुदंड बसणार आहे. त्याबरोबरच त्याची मानसिकता देखील खराब झाली आहे. त्यांना एका भयंकर खेळापासून सुरुवात झाली. पेपर फुटला तेव्हाच रद्द करायला हवा होता. म्हणजे विद्यार्थ्यांवर फारसा ताण आला नसता. परंतु आता इतके दिवस निघून गेल्यानंतर त्यांच्या निकाल लागल्यानंतर परीक्षा रद्द होते हे किती भयंकर आहे.

                                – डॉ निलेश चांडक (कॅन्सरतज्ञ)

                                        NEET विद्यार्थी पालक 

 

बातमी शेअर करा !
Tags: NEETतणावातनीट रद्दपरीक्षापालकपालकांमध्ये चिंतारद्दविद्यार्थी नाराज
Previous Post

पंचायत समितीचे दोन अभियंत्यांचा पदभार काढला!

Next Post

जळगाव महसूल विभागात एसीबीचा सापळा ; मंडल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव महसूल विभागात एसीबीचा सापळा ; मंडल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक!

जळगाव महसूल विभागात एसीबीचा सापळा ; मंडल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif