• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगाव महसूल विभागात एसीबीचा सापळा ; मंडल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक!

चौकशी थांबवण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याची लाखाची मागणी; तडजोडीनंतर ५० हजारांवर व्यवहार.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 13, 2026
in क्राईम, जळगाव
जळगाव महसूल विभागात एसीबीचा सापळा ; मंडल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

      नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : नशिराबाद परिसरातील एका प्रकरणाची चौकशी बंद करण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महसूल विभागातील मंडळ अधिकारी आणि एका खासगी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून ही कारवाई केली असून, खासगी इसमाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरोधात अवैध खोदकामासंदर्भात विविध शासकीय कार्यालयांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची चौकशी थांबवण्यासाठी मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांनी सुरुवातीला एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. नंतर तडजोडीनंतर ५० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित करण्यात आले.

 

तक्रारदाराने याबाबत नाशिक एसीबीकडे धाव घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यामध्ये लाचेची रक्कम खासगी इसम सुरेंद्र प्रल्हाद अहिरे याच्याकडे देण्यास सांगण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर एसीबीच्या पथकाने पिंप्राळा तलाठी कार्यालय परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने सुरेंद्र अहिरे याला ५० हजार रुपये दिल्यानंतर पथकाने त्याला तत्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणी मंडळ अधिकारी मिलींद देवरे आणि सुरेंद्र अहिरे यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नाशिक एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अधिकारी जाळ्यातएसीबीक्राईमगुन्हालाच लुचपत अधिकारीलाचखोर
Previous Post

डॉक्टरांचे भवितव्य घडवणारी परीक्षा ऑफलाइन का?

Next Post

जळगाव जनता सहकारी बँकेच्या ‘नेट बँकिंग’ सेवेचा शुभारंभ!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव जनता सहकारी बँकेच्या ‘नेट बँकिंग’ सेवेचा शुभारंभ!

जळगाव जनता सहकारी बँकेच्या ‘नेट बँकिंग’ सेवेचा शुभारंभ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif