• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अटलांटा प्रकरणात 200 कोटींच्या दंडाची चर्चा?

50 कोटींच्या पहिल्या कामानंतर अपूर्ण रस्त्यांवरच दुसरी 50 कोटींची वर्क ऑर्डर? नियम डावलून ॲडव्हान्स दिल्याचा आरोप

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 12, 2026
in जळगाव, ब्रेकिंग, महापालिका
अटलांटा प्रकरणात 200 कोटींच्या दंडाची चर्चा?
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहर महानगरपालिकेच्या अटलांटा कंपनी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत असून, मुदतीत रस्ते काम पूर्ण न करताही संबंधित कंपनीला कोट्यवधी रुपयांचे ॲडव्हान्स देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. तसेच करारातील अटींनुसार आकारण्यात येणारा दंड आजघडीला तब्बल 200 कोटी रुपयांच्या घरात गेल्याचा दावा करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सर्व रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी अटलांटा कंपनीला सुरुवातीला 50 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर देण्यात आली होती?. हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. मात्र संबंधित कंपनीने मुदतीत काम पूर्ण केले नाही.

दरम्यान, पहिले काम अपूर्ण असतानाच उर्वरित रस्त्यांसाठी संबंधित कंपनीला पुन्हा 50 कोटी रुपयांची दुसरी वर्क ऑर्डर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे?. विशेष म्हणजे, या दुसऱ्या कामासाठी कंपनीने पुन्हा 10 कोटी रुपयांचे ॲडव्हान्स मागितले होते?

पहिल्या वर्क ऑर्डरसाठी देखील पालिकेकडून कंपनीला 10 कोटी रुपयांचे ॲडव्हान्स देण्यात आले होते?. तर दुसऱ्या वर्क ऑर्डर संदर्भात पीडब्ल्यूडी विभागातील अकाउंटंट यांनी “रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय पेमेंट देता येणार नाही” असा स्पष्ट शेरा मारल्याचे सांगितले जात आहे.

त्यानंतर तत्कालीन अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी हे प्रकरण महासभेपुढे ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे शेरे आणि सूचना दुर्लक्षित करत हा विषय महासभेत न आणता अटलांटा कंपनीला पुन्हा ॲडव्हान्स देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, अटलांटा कंपनीसोबतच्या करारातील अटीं शर्ती नुसार शहरातील प्रत्येक रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित रस्त्यास दररोज 500 रुपये दंड आकारण्याची तरतूद होती. शहरातील अनेक रस्त्यांच्या हिशोबाने हा दंड प्रति महिना आणि त्यानंतर वर्षानुवर्षे वाढत गेला असून, त्याची एकूण रक्कम अंदाजे 200 कोटी रुपयांच्या घरात पोहोचत असल्याचे समोर येत आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “जळगाव शहर महानगरपालिकेच्या अटलांटा गैरव्यवहार प्रकरणात सुप्रीम कोर्टामार्फत एसआयटी चौकशी नेमण्यात आली. ही चौकशी सुरू असताना पुन्हा नव्याने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणे योग्य आहे का? एसआयटी चौकशी सरकारकडून थांबवण्यात आली का? गुन्हा दाखल करण्यामागे काही व्यवहार तर होत नाही ना?” अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

या संपूर्ण प्रकरणामुळे मनपाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अटलांटा कंपनीला दिलेल्या सवलती आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अटलांटाअटलांटा कंपनी प्रकरणएसआयटीघोटाळाचौकशीजळगावमहापालिका
Previous Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलचा दहावीला १००% निकाल; भूमिका मोरे ९५% गुणांसह प्रथम

Next Post

सागर पार्कवरील क्रिकेट स्पर्धांवरील बंदीला विरोध!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
सागर पार्कवरील क्रिकेट स्पर्धांवरील बंदीला विरोध!

सागर पार्कवरील क्रिकेट स्पर्धांवरील बंदीला विरोध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif