• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलचा दहावीला १००% निकाल; भूमिका मोरे ९५% गुणांसह प्रथम

स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियममध्ये विद्यार्थ्यांची उज्वल कामगिरी; गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 11, 2026
in जळगाव ग्रामीण, परीक्षा निकाल
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलचा दहावीला १००% निकाल; भूमिका मोरे ९५% गुणांसह प्रथम
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

पाळधी : नुकताच इयत्ता १० वी स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियमचा निकाल जाहीर झाला असून, इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथील विद्यार्थ्यांनी यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. CBSE प्रमाणेच स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियममध्येही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

या परीक्षेत भूमिका मोरे हिने ९५% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळविले. त्यामध्ये —

खुशी देशमुख – ९१%

विवेक पाटील – ९१%

दिवेश सोळंके – ९०%

माही पांडे – ९०%

यांचा समावेश आहे.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन इंजि. श्री. नरेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. शाळेचे कार्यकारी अधिकारी श्री. जी. डी. पाटील सर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. शारदा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यशामागील शिक्षकवृंदांच्या मेहनतीचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पालकांनीही आनंद व समाधान व्यक्त केले.

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलने नेहमीप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपत यंदाही उत्कृष्ट निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: SSCresultइंग्लिश मीडियमइम्पिरियलइंटरनॅशनलस्कूलदहावीनिकालपाळधीभूमिकामोरे
Previous Post

जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

Next Post

अटलांटा प्रकरणात 200 कोटींच्या दंडाची चर्चा?

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अटलांटा प्रकरणात 200 कोटींच्या दंडाची चर्चा?

अटलांटा प्रकरणात 200 कोटींच्या दंडाची चर्चा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif