नवराज्य Live न्यूज नेटवर्क
धरणगाव : शहरातील भवरखेडा रस्त्यावरील आदिवासी भिल समाज वस्तीत दीर्घकाळापासून पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने परिसरात बोरवेल करून पाण्याची टाकी बसविण्यात आली तसेच नळ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

या कामासाठी शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. पापाशेट वाघरे, पवन महाजन, पप्पू भावे, वाल्मीक पाटील, विलास महाजन तसेच सर्व शिवसेना नगरसेवकांनी पुढाकार घेत हा उपक्रम पूर्णत्वास नेला.
दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले. प्रतापराव पाटील यांच्या हस्ते फित कापून या पाणी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे आदिवासी भिल समाज वस्तीत पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.







