• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आंदोलन

पगारवाढ मागणीवरून कामगार संतप्त; दोन कर्मचाऱ्यांना कामावर न घेतल्याने प्लांट बंद

कंत्राटी पद्धत बंद करण्याची मागणी; सहाय्यक कामगार आयुक्तांकडे निवेदन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 6, 2026
in आंदोलन, जळगाव
पगारवाढ मागणीवरून कामगार संतप्त; दोन कर्मचाऱ्यांना कामावर न घेतल्याने प्लांट बंद
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव-  एमआयडीसी परिसरातील एका औद्योगिक कंपनीत पगारवाढ आणि कंत्राटी पद्धत बंद करण्याच्या मागणीवरून कामगारांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. दोन कर्मचाऱ्यांना कामावर न घेतल्याच्या निषेधार्थ कामगारांनी कंपनीतील दोन प्लांट बंद ठेवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उज्ज्वल प्रकाश कोळी हे गेल्या पाच वर्षांपासून संबंधित कंपनीत कार्यरत असून त्यांना दररोज 471 रुपये वेतन मिळत होते. मागील वर्षापासून पगारवाढ न झाल्याने त्यांनी वेतनवाढीची मागणी केली होती. मात्र, या मागणीनंतर त्यांना लक्ष्य करून 2 मे 2026 रोजी कामावरून घरी बसवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

व्यवस्थापनाकडून “एक महिन्यानंतर संपर्क करू” असे सांगण्यात आले होते. मात्र, या निर्णयाविरोधात कंपनीतील इतर कामगार आक्रमक झाले असून, संबंधित कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतल्याशिवाय कामावर हजर होणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

कामगारांच्या या भूमिकेमुळे कंपनी प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याला काही दिवस थांबण्यास सांगितले. मात्र, अद्यापही कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या परिस्थितीत उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामास व्यवस्थापन जबाबदार राहील, असे कामगारांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, संतप्त कामगारांनी गणेश कॉलनी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निवेदन देत पगारवाढ, कंत्राटी पद्धत बंद करणे आणि सलग सेवेनुसार कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी केली आहे. दोन कर्मचाऱ्यांना कामावर न घेतल्याच्या निषेधार्थ कामगारांनी कंपनीतील दोन प्लांट बंद ठेवत लाक्षणिक आंदोलनही केले.

या प्रकरणामुळे एमआयडीसी परिसरातील औद्योगिक वातावरणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून यावर तोडगा काढला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: आंदोलनकंपनीकाम बंदकामगारकामगार आयुक्तजळगावमोर्चासंतप्त
Previous Post

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

Next Post

सोशल मीडियावरील अभद्र टिप्पण्यांवर कारवाई करा.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
सोशल मीडियावरील अभद्र टिप्पण्यांवर कारवाई करा.

सोशल मीडियावरील अभद्र टिप्पण्यांवर कारवाई करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif