• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आंदोलन

सोशल मीडियावरील अभद्र टिप्पण्यांवर कारवाई करा.

भाजप महिला मोर्चाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन ; महिलांबाबत अश्लील भाषा वापरणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 6, 2026
in आंदोलन, जळगाव
सोशल मीडियावरील अभद्र टिप्पण्यांवर कारवाई करा.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : सोशल मीडियावर महिलांबाबत तसेच भारतीय जनता पक्षाविषयी अभद्र व बदनामीकारक टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत भाजप महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.यावेळी महापौर दीपमाला काळे दीपक सूर्यवंशी नीता परदेशी,रेखा पाटील, उज्वला बेंडाळे, गायत्री राणे, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ,राजेश सोनवणे, नगरसेवक रमेश मतानी, ग्रामीणचे संजय चौधरी, गिरीश वराडे, मनोज भांडारकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ मे रोजी भाजपा पक्षाने विविध राज्यांतील निवडणुकीतील यशानंतर जळगाव जिल्ह्यात जल्लोष कार्यक्रम आयोजित केला होता. यासंदर्भातील बातमी एका फेसबुक पेजवर प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित पोस्टवर एका व्यक्तीने अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी केली. या टिप्पणीत महिलांविषयी अपमानास्पद भाषा वापरून त्यांच्या चारित्र्यावरही टीका करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या टिप्पणीमुळे केवळ पक्षाचीच नव्हे तर संपूर्ण महिला समाजाची बदनामी होत असून समाजात वैमनस्य निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय दंड संहितेनुसार संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !
Tags: कारवाईपोलीसपोलीस स्टेशनबीजेपीभाजपामहिला मोर्चामागणी
Previous Post

पगारवाढ मागणीवरून कामगार संतप्त; दोन कर्मचाऱ्यांना कामावर न घेतल्याने प्लांट बंद

Next Post

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद !

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif