• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

पद्मालय हे गणपतीचे अत्यंत प्राचीन व जागृत स्थान मानले जाते.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 6, 2026
in जळगाव, धार्मिक
अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव दि.५ प्रतिनिधी– पद्मालय गणपती मंदिर येथे अंगारकी चतुर्थीच्या पावन निमित्ताने पहाटेच्या मंगलमय वातावरणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक, विधिवत पूजा व आरती संपन्न झाली. पहाटे ४ वाजता पार पडलेल्या या पूजेमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.

पद्मालय हे गणपतीचे अत्यंत प्राचीन व जागृत स्थान मानले जाते. विशेष म्हणजे डाव्या व उजव्या सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी विराजमान असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. संकष्टी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करुन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज पहाटे विधिवत पूजा व आरती केली. व त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

 

यावेळी मंदिराचे पुजारी गणेश वैद्य व केशवराव पुराणिक यांनी विधीपूर्वक पूजा सांगितली. पूजा संपल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंदिराचा इतिहास तसेच सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय ट्रस्टतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा शाल व गणरायाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विश्वस्त आनंदराव पाटील, भिका पाटील, गोकुळ देशमुख, डॉ. पांडुरंग पिंगळे, राजेश तिवारी, अर्जुन पाटील, शिरीष बर्वे यांच्यासह तहसीलदार गोपाल पाटील, जैन इरिगेशनचे अनिल जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

देवस्थानचे सहकारी अशोक पाटील व जोशी यांनी पूजेचे नियोजन केले. संकष्टी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पद्मालय येथे होणारा हा धार्मिक सोहळा भाविकांसाठी श्रद्धेचा असतो. उन्हाची तिव्रता लक्षात घेता भाविकांसाठी पद्मालय देवस्थान तर्फे सावलीसाठी मंडपाची तसेच कुलर व थंड पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात येते.

 

– श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय येथे गणरायाचे आरती करताना जिल्हाधिकारी रोहन घुगे त्यांच्यासमवेत विश्वस्त मंडळ व भाविक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या सत्कार करताना श्री गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ

बातमी शेअर करा !
Tags: अंगारकी चतुर्थीएरंडोल तालुकाजिल्हाधिकारीजैन इरिगेशनधार्मिकपद्मालयमहापूजा
Previous Post

​महात्मा फुले मार्केटमधील अतिक्रमणांवर महापौरांचा संताप!

Next Post

पगारवाढ मागणीवरून कामगार संतप्त; दोन कर्मचाऱ्यांना कामावर न घेतल्याने प्लांट बंद

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पगारवाढ मागणीवरून कामगार संतप्त; दोन कर्मचाऱ्यांना कामावर न घेतल्याने प्लांट बंद

पगारवाढ मागणीवरून कामगार संतप्त; दोन कर्मचाऱ्यांना कामावर न घेतल्याने प्लांट बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif