• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

वराड फाट्याजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, सहा जखमी

चालत्या क्रुझरचे चाक निखळल्याने दुर्घटना; आनंदाचा प्रवास क्षणात शोकांत

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 29, 2026
in Uncategorized, अपघात, जळगाव
वराड फाट्याजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, सहा जखमी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

गुजरातहून नववधूला सासरी घेऊन निघालेल्या कुटुंबावर दुर्दैवाचा घाला कोसळला. धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे वऱ्हाड गुजरातमधील वापी येथून अकोल्याच्या दिशेने प्रवास करत होते. दरम्यान, वराड परिसरात पोहोचताच क्रुझर वाहनाचे पुढील चाक अचानक निखळले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर जोरदार धडक बसली. धडकेनंतर वाहन उलटल्याने अपघाताची तीव्रता वाढली.

या दुर्घटनेत पूजा रवी वाघळकर (२५) या नववधूसह दत्तू तुळशीराम भागवत (४२) आणि जगदीश चंदूभान वाघळकर (५२) यांचा मृत्यू झाला. अपघातात एका लहान मुलासह सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अंश नितेश कडोले (१४) याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. वातावरणात शोककळा पसरली असून, लग्नाचा आनंद काही क्षणांतच दुःखात बदलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, धरणगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावअपघातधरणगावनववधूमृत्यूभीषणअपघातरस्तेसुरक्षावराडफाटा
Previous Post

मा. जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांची मालिका

Next Post

आजची शिक्षण व्यवस्था,दिशा आणि विचार काळाची गरज

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आजची शिक्षण व्यवस्था,दिशा आणि विचार काळाची गरज

आजची शिक्षण व्यवस्था,दिशा आणि विचार काळाची गरज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif