• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मा. जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांची मालिका

पाळधीत फिरते नेत्रालय, घंटागाडी लोकार्पण व रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 29, 2026
in Uncategorized, जळगाव, स्थानिक बातम्या
मा. जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांची मालिका
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

पाळधी येथे जिल्हा परिषद माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. जीपीएस ग्रुपतर्फे मंगळवारी अत्याधुनिक फिरते नेत्रालय, घंटागाडीचे लोकार्पण तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “सेवा हेच खरे व्रत” या भावनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान पाळधी येथील शासकीय विश्रामगृह व गाव परिसरात विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी अत्याधुनिक फिरत्या नेत्रालयाचा शुभारंभ करण्यात आला. ही सेवा गावोगावी जाऊन नागरिकांची नेत्र तपासणी करणार असून, तपासणीनंतर गरजू रुग्णांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. तसेच शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी पनवेल येथील अत्याधुनिक रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

यासोबतच विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलचे वाटप करण्यात आले. आरोग्य केंद्रात रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले, तसेच गरजूंना अन्नदानही करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी आयोजित रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली.

दरम्यान, नगरपरिषद नशिराबादला प्राप्त झालेल्या आधुनिक अग्निशमन वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पाळधी बु. ग्रामपंचायतीतर्फे गावाच्या स्वच्छतेसाठी घंटागाडीचेही लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील, डी. ओ. पाटील, सरपंच विजय पाटील, शरद कोळी, माजी सभापती सचिन पवार, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, उपमहापौर मनोज चौधरी, श्याम कोगटा, उपनगराध्यक्ष विजय महाजन, जि.प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सर्व उपक्रमांमुळे प्रतापराव पाटील यांचा वाढदिवस सामाजिक संदेश देणाऱ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला.

बातमी शेअर करा !
Tags: पाळधीप्रतापराव पाटीलफिरते नेत्रालयरक्तदान शिबिरवाढदिवस उपक्रमसेवाभावी उपक्रम
Previous Post

पारोळ्यात “एसीबीचा सापळा यशस्वी : २ हजारांची लाच घेताना आरोग्य अधिकारी रंगेहाथ”!

Next Post

वराड फाट्याजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, सहा जखमी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
वराड फाट्याजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, सहा जखमी

वराड फाट्याजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, सहा जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif