• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांची यशस्वी शस्त्रक्रिया

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 24, 2026
in आरोग्य, जळगाव
महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

दीर्घकाळापासून पोटदुखी व रक्तस्त्रावाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या ३७ वर्षीय महिलेच्या पोटातून सुमारे दीड किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे संबंधित महिलेला मोठा दिलासा मिळाला असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील अनिता भिल या ३७ वर्षीय महिला रूग्णाला गेल्या काही महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला हा त्रास साधारण असल्याचे वाटत असले तरी हळूहळू पोटदुखी वाढू लागली. यासोबतच तिला अनियमित रक्तस्त्रावाची समस्या देखील जाणवत होती. त्रास वाढत असल्यामुळे अखेर महिलेनं जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचारासाठी संपर्क साधला. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी, डॉ. ऐश्वर्या, डॉ. प्राजक्ता यांच्या टीमने महिलेची सखोल तपासणी केली.

त्यानंतर सोनोग्राफीसह विविध प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांदरम्यान महिलेच्या पोटात मल्टीपल फायब्रॉइड असल्याचे निदान झाले. फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयामध्ये तयार होणार्‍या गाठी असून काही वेळा त्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास गंभीर त्रास निर्माण होऊ शकतो.डॉक्टरांनी तपासणीनंतर रुग्णाच्या प्रकृतीचा बारकाईने अभ्यास केला. गाठींचा आकार मोठा असल्यामुळे औषधोपचाराने फायदा होण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट झाले

त्यामुळे शस्त्रक्रिया करून गाठी काढणे हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले.कुटुंबीयांची संमती घेतल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर स्त्रीरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने हिस्टेक्टोमी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या गर्भाशयामध्ये तयार झालेल्या अनेक गाठी काढण्यात आल्या. विशेष म्हणजे या गाठींचे एकूण वजन सुमारे दीड किलो इतके होते. शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली आणि कोणतीही गुंतागुंत न होता ती यशस्वीरीत्या पूर्ण झाली.शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती सुधारली आहे. रुग्णालयातील अनुभवी डॉक्टर व आधुनिक वैद्यकीय सुविधा यांच्या मदतीने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडता आली, असेही डॉक्टरांनी सांगितले.

कोट…गाठीचे वजन दीड किला

गर्भाशयातील फायब्रॉइड हा महिलांमध्ये आढळणारा एक सामान्य पण दुर्लक्ष केल्यास गंभीर ठरू शकणारा आजार आहे. पोटदुखी, जास्त रक्तस्त्राव, मासिक पाळीमध्ये अनियमितता किंवा पोटात गाठ असल्याची जाणीव अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. अशा प्रकारचा त्रास जाणवत असल्यास त्वरित स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेवर निदान व उपचार झाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.

– डॉ. रश्मी संघवी, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

 

बातमी शेअर करा !
Tags: आरोग्यगर्भाशयजळगावफायब्रॉइडमहिलांचेआरोग्यवैद्यकीयबातमी
Previous Post

माजी महापौर ललित कोल्हे यांना जामीन मंजूर

Next Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षकांकडून शैक्षणिक साहित्य निर्मितीचा उपक्रम

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षकांकडून शैक्षणिक साहित्य निर्मितीचा उपक्रम

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षकांकडून शैक्षणिक साहित्य निर्मितीचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif