नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव (प्रतिनिधी) – मामुराबाद रोड परिसरातील कथित बोगस कॉल सेंटर प्रकरणात अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जास मंजुरी दिल्यामुळे दीर्घकाळानंतर त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

काही महिन्यांपूर्वी जळगाव पोलिसांनी मामुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर कारवाई करत कथित आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर उघडकीस आणले होते. या ठिकाणावरून परदेशातील नागरिकांना लक्ष्य करून ऑनलाइन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणात ललित कोल्हे यांच्यासह कोलकाता येथील चार प्रमुख संशयितांसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीप्रमाणे हा प्रकार केवळ फसवणुकीपुरता मर्यादित नसून संघटित गुन्हेगारीशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले होते.

अटकेनंतर कोल्हे यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. यापूर्वी जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नाकारला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर तेथून जामीन मंजूर झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ललित कोल्हे शनिवारी येणार जळगावात
सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. ते सध्या नाशिक येथील मध्यवर्ती कार्य कारागृहात आहेत कागद पत्राचे पूर्ततेनंतर ते कारागृह बाहेर येतील साधारणता उद्या ते जळगाव येण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यांना जमीन मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पियुष कोल्हे बोलताना झाले भावुक!
वडिलांना जामीन मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो निवडणुका झाल्या व निवडणुकीत देखील विजय मिळवला मात्र त्यावेळेस देखील वडील ललित कोल्हे हे उपस्थित राहू शकले नाह. काही दिवसांवरच माझे लग्न येऊन ठेपले आहे मात्र त्यांचा त्यांना जामीन मिळाल्याने मला शब्द सुचत नाही मात्र याबाबत मी समाधानी असून न्यायालयाचे आभार मानतो. मी माझे प्रण पूर्ण केले असून, मी चप्पल घालणार आहे असे पियुष कोल्हे यांनी नवराज्याशी बोलताना ते भावुक झाले.






