• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home अपघात

खंडवाजवळ भीषण कार अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

पहाटे घडली दुर्घटना; वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 18, 2026
in अपघात, जिल्हा
खंडवाजवळ भीषण कार अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य न्यूज नेटवर्क

जळगाव (प्रतिनिधी):

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरीगाव परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतांमध्ये श्याम विक्रम ठाकूर (४५), शोभा विक्रम ठाकूर (४०) आणि शिवन्या श्याम ठाकूर (५) यांचा समावेश आहे. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूर कुटुंबीय उज्जैन, ओंकारेश्वर आणि सिहोर येथे धार्मिक दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून आपल्या मूळ गावी परतत असताना पहाटेच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्यावर उलटली आणि अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की काही जणांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शोभा ठाकूर व चिमुरडी शिवन्या हिचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

या दुर्घटनेमुळे वरणगाव फॅक्टरी परिसर तसेच दयापूर शिवारात शोककळा पसरली असून ठाकूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अपघातचार जखमीतीन ठारदुर्घटनाभुसावळमध्य प्रदेशरस्ता अपघातवरणगाव
Previous Post

शिरसोलीत महापुरुषांचे बॅनर फाडल्याने तणाव!

Next Post

चाळीसगाव होणार स्वतंत्र जिल्हा?

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
चाळीसगाव होणार स्वतंत्र जिल्हा?

चाळीसगाव होणार स्वतंत्र जिल्हा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif