• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

चाळीसगाव होणार स्वतंत्र जिल्हा?

महाराष्ट्रात ११ नवीन जिल्ह्यांची तयारी; प्रशासन अधिक वेगवान करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 19, 2026
in जिल्हा, ब्रेकिंग
चाळीसगाव होणार स्वतंत्र जिल्हा?
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

मुंबई/जळगाव (प्रतिनिधी):महाराष्ट्रातील प्रशासन अधिक कार्यक्षम, लोकाभिमुख आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात तब्बल ११ नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा सध्या जोर धरत असून, त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा समावेश असल्याने स्थानिक पातळीवर उत्सुकता वाढली आहे.

राज्य सरकारने अलीकडेच ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मंजुरी दिली आहे. या निर्णयाकडे भविष्यातील नवीन जिल्हे निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

ज्या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यामध्ये

ठाणे (कल्याण), रत्नागिरी (दापोली), पुणे (बारामती), सातारा (फलटण), सोलापूर (पंढरपूर), जळगाव (चाळीसगाव), अमरावती (अचलपूर), यवतमाळ (पुसद), बुलढाणा (खामगाव), नांदेड (किनवट) आणि नागपूर (कळमेश्वर) यांचा समावेश आहे.

या सर्व ठिकाणी भविष्यात स्वतंत्र जिल्हे निर्माण करण्याचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याचे समजते. विशेष म्हणजे, चाळीसगावला जिल्ह्याचा दर्जा मिळण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने जळगाव जिल्ह्यात या निर्णयाकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.

दरम्यान, राज्यात एकूण २० नवीन जिल्हे आणि ८१ नवीन तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे संकेत मिळत आहेत.

मात्र, या सर्व निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होण्यासाठी आगामी जनगणनेची आकडेवारी महत्त्वाची ठरणार असून, त्यानंतरच नवीन जिल्ह्यांबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अप्पर जिल्हाधिकारीचाळीसगावजळगावजिल्हातालुकाप्रशासनब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र
Previous Post

खंडवाजवळ भीषण कार अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

Next Post

मुंबईच्या वानखेडे स्टेडियम पेक्षाही जेसीएलचे ग्राउंड चांगल्या दर्जाचे – मंत्री गिरीश महाजन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मुंबईच्या वानखेडे स्टेडियम पेक्षाही जेसीएलचे ग्राउंड चांगल्या दर्जाचे – मंत्री गिरीश महाजन

मुंबईच्या वानखेडे स्टेडियम पेक्षाही जेसीएलचे ग्राउंड चांगल्या दर्जाचे - मंत्री गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif