• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पिवळसर पाण्यावरून सभापतींचा अधिकाऱ्यांना जाब

उमाळा जलशुद्धीकरण प्रकल्पाची स्थायी समिती सभापती डॉ चंद्रशेखर पाटील यांनी केली पाहणी 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 14, 2026
in जळगाव, महापालिका
पिवळसर पाण्यावरून सभापतींचा अधिकाऱ्यांना जाब
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्यLive न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील काही भागात मागील काही दिवसांपासून पिवळसर पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी सोमवारी उमाळा जलशुद्धीकरण प्रकल्पाची तातडीने पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत पाणीपुरवठा यंत्रणेची सखोल तपासणी केली.

दारकानगर, अयोध्यानगर, सत्यम पार्क, खोटेनगर आदी परिसरांत पिवळसर पाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सभापतींनी प्रकल्पावर भेट देत जलशुद्धीकरण प्रक्रिया, गाळणी यंत्रणा आणि क्लोरीनच्या वापराबाबत सविस्तर माहिती घेतली.

पाहणीदरम्यान प्रकल्पातील विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून पाणीपुरवठ्यातील त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी श्यामकांत भांडारकर, राहुल पाटील, विजय चौधरी, योगेश जाधव आदी उपस्थित होते.

तापमानामुळे रंगात बदल

दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी जलकुंभांमध्ये पाणी साठवून त्यात निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीन टाकले जाते. उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे ही प्रक्रिया अधिक वेगाने होत असल्याने पाण्याला किंचित पिवळसर छटा येते. काही वेळाने हे पाणी स्वच्छ व पारदर्शक होते, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावमहानगरपालिकाशहर
Previous Post

महापालिकेने कठोर पावलं उचलून मोबाईल टावर कडील थकबाकी वसूल करावी!

Next Post

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार 

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif