• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयत समन्वय २०२६ ला सुरूवात

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 14, 2026
in जळगाव, शैक्षणिक
आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आग्नेय बॅचतर्फे आयोजित समन्वय २०२६ सप्ताहांतर्गत आर्ट गॅलरीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार साकारले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमीबीएस अभ्यासक्रमाच्या आग्नेय बॅचतर्फे १२ ते १८ एप्रिल या कालावधीत समन्वय २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. १२ एप्रिल रोजी आर्ट गॅलरीने शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. सुहास बोरले, डॉ. अनिकेत पाटील, वैद्यकीय अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. विजय बाविस्कर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच धन्वंतरी पूजन आणि स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर्स उपस्थित होते. आर्ट गॅलरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी इन्फाईनाइट हॉरीझन या थीमवर आधारीत कलाकृती सादर करण्यात आल्या. यात भविष्यातील जग, अश्मकालीन युग, ब्रम्हांड, पाण्याखालील जग, हम्पी संस्कृती, शालीमार बाग, मिनाक्ष मंदिर, रायगड किल्ला अशा विविध १० कलाकृती विद्यार्थ्यांनी अत्यंत सुरेखपणे साकारल्या होत्या.

 

तसेच हार्दीक जैस्वाल या विद्यार्थ्याने स्व. गोदावरी आजींचे तयार केलेल्या पोट्रेट डॉ. उल्हास पाटील यांना भेट म्हणून देण्यात आले. यावेळी न्युरोसर्जरी तज्ज्ञ डॉ. अनिकेत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी समन्वय २०२६ चे ट्रेलर स्क्रीनवर दाखविण्यात आले. तसेच डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्याच्या या कलाकृतीचे कौतुक केले. सूत्रसंचालन अमित पाटील, आस्था भागवत यांनी केले.

यशस्वीतेसाठी वेदांत दाते, उन्नती खरोडे, हार्दिक जैस्वाल, शुभदा तोडकर, ऋत्वीक भुजबळ, मुस्कान सिद्दीकी यांनी परिश्रम घेतले. १३ एप्रिल रोजी प्रॉम्प नाईटचा कार्यक्रम घेण्यात आला. दि. १४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अविष्कारजळगावडॉक्टर उल्हास पाटीलबातमीमहाविद्यालयवैद्यकीय
Previous Post

पिवळसर पाण्यावरून सभापतींचा अधिकाऱ्यांना जाब

Next Post

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif