• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील भ्रष्टाचाराचा मुद्दा संसदेत; खासदार स्मिताताई वाघ यांची चौकशीची मागणी

ICAR निधी गैरवापर, अनियमिततेवर केंद्रीय कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधले

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 2, 2026
in जिल्हा, विशेष बातमी
जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील भ्रष्टाचाराचा मुद्दा संसदेत; खासदार स्मिताताई वाघ यांची चौकशीची मागणी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : जळगाव जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र (KVK) येथील कथित भ्रष्टाचार आणि गंभीर अनियमिततेचा मुद्दा खासदार स्मिताताई वाघ यांनी संसदेत जोरदारपणे उपस्थित केला. त्यांनी केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्र्यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधत तात्काळ चौकशीची मागणी केली.भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) कडून मिळणाऱ्या सरकारी निधीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत.यासोबतच केंद्रातील जुनी झाडे अनधिकृतपणे तोडणे, ट्रॅक्टर व इतर यंत्रसामग्रीचा वैयक्तिक वापर करणे अशा गंभीर अनियमितता उघड झाल्या आहेत.

 

“कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अपेक्षित सुविधा व मदत मिळत नाही. मी स्वतः केंद्राचा दौरा केला असता अनेक त्रुटी व गैरप्रकार समोर आले,” असे त्यांनी संसदेत स्पष्ट केले. या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, हा मुद्दा यापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेतही मांडण्यात आला होता, तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

 

त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कृषी विज्ञान केंद्रे त्यांच्या मूळ उद्देशानुसार कार्यरत राहतील याची खात्री करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

या मुद्द्यावर कृषी मंत्रालयाकडून लवकरच उत्तर अपेक्षित असून, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये या केंद्राविषयी नाराजी असल्याचेही समोर आले आहे. खासदार स्मिताताई वाघ यांनी हा प्रश्न संसदेत उपस्थित करून शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला आहे.

बातमी शेअर करा !
Tags: कृषी भ्रष्टाचारखासदारतक्रारभ्रष्टाचारश्रीमती स्मिता वाघसंसदसंसदेत प्रश्न
Previous Post

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या, प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे 

Next Post

शेतकरी संकटात, ‘संकटमोचक’ राजकीय संकट निवारणातच व्यस्त – संजय राऊत यांचा गिरीश महाजनांवर निशाणा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शेतकरी संकटात, ‘संकटमोचक’ राजकीय संकट निवारणातच व्यस्त – संजय राऊत यांचा गिरीश महाजनांवर निशाणा

शेतकरी संकटात, ‘संकटमोचक’ राजकीय संकट निवारणातच व्यस्त – संजय राऊत यांचा गिरीश महाजनांवर निशाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif