• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या, प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे 

दोन्ही बी.जे. मार्केटमधील समस्यांबाबत नगरसेवकांचे पदाधिकाऱ्यांची बैठक 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 1, 2026
in आरोग्य, जळगाव, महापालिका
प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या, प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये गाजलेल्या प्रसाधनगृह स्वच्छतेच्या प्रश्नावर महापौर दीपमाला काळे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. बुधवारी (१ एप्रिल) महापालिकेत आयोजित विशेष बैठकीत महापौरांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या शौचालय ठेकेदाराला अंतिम नोटीस देऊन प्रसंगी त्याचा मक्ता (ठेका) रद्द करण्याचे कठोर आदेश दिले आहेत.

 

प्रसाधनगृहांची दुरवस्था आणि सुरक्षा ऐरणीवर

महासभेत स्थानिक नगरसेवक तथा शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, नगरसेविका अर्चना संजय पाटील यांनी मार्केटमधील प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत नवीन व जुन्या बीजे मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. जुन्या बीजे मार्केटमधील कारंजा नादुरुस्त असणे, रात्रीच्या वेळी विद्युत दिव्यांअभावी पसरणारा अंधार आणि त्यातून होणारे गैरप्रकार, ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या अतिक्रमणामुळे तुटलेली गेट्स आणि वाहन पार्किंगची समस्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची कमतरता आदी समस्या सांगितल्या.

 

नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, “शौचालयांच्या अस्वच्छतेमुळे मार्केटमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली असून व्यापाऱ्यांना व ग्राहकांना तेथे उभे राहणे कठीण झाले आहे.” तर नगरसेविका अर्चना पाटील यांनी मार्केटमध्ये रॅम्प नसल्याने होणारी अडचण आणि सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे निर्माण झालेला गंभीर प्रश्न मांडला. प्रसाधनगृहात ठेकेदार भंगार साठवून ठेवत असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.

 

महापौरांचे कडक निर्देश

सर्व तक्रारी ऐकून घेतल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला पुढील आदेश दिले.

ठेकेदारावर कारवाई: प्रसाधनगृहाची स्वच्छता न राखणाऱ्या ठेकेदाराला नोटीस द्या आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्याचा ठेका तात्काळ रद्द करून नवीन नियुक्ती करा.

स्वच्छता अभियान: महापौरांच्या संकल्पनेतून येत्या शुक्रवारी बी.जे. मार्केटमध्ये विशेष ‘साफसफाई अभियान’ राबवले जाईल. त्यापूर्वी गुरुवारी अधिकारी प्रत्यक्ष जागेची पाहणी करतील.

लिफ्ट आणि पायाभूत सुविधा: मार्केटमध्ये लिफ्ट बसवण्यासाठी तांत्रिक इस्टिमेट (अंदाजपत्रक) तयार करण्याचे आदेश महापौरांनी बांधकाम विभागाला दिले.

 

या बैठकीला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे, नगरसेविका अर्चना पाटील, आशा पाटील, नगरसेवक अमित काळे, सहाय्यक आयुक्त उदय पाटील, स्वच्छता अधिकारी अनिल कांबळे, पाणीपुरवठा प्रमुख शामकांत भंडारकर, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, विद्युत विभागाचे संदीप मोरे यांच्यासह आरोग्य, बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

“गेल्या १५ वर्षांत आम्हाला समस्या मांडण्यासाठी महापालिकेत कधीही बोलावले गेले नव्हते. महापौरांनी स्वतःहून स्वारस्य दाखवून आमची बाजू ऐकून घेतली, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.”

— असोसिएशन पदाधिकारी

बातमी शेअर करा !
Tags: अस्वच्छताठेकेदारनोटीसप्रसाधनगृहमहापालिकामहापौरमहासभा
Previous Post

रस्त्याच्या कामावरून ठेकेदाराकडून सभापतींना शिवीगाळ; धमकीची गंभीर घटना

Next Post

जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील भ्रष्टाचाराचा मुद्दा संसदेत; खासदार स्मिताताई वाघ यांची चौकशीची मागणी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील भ्रष्टाचाराचा मुद्दा संसदेत; खासदार स्मिताताई वाघ यांची चौकशीची मागणी

जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील भ्रष्टाचाराचा मुद्दा संसदेत; खासदार स्मिताताई वाघ यांची चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif