• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

गोखलेज् ॲडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे छायाचित्रांचे प्रदर्शन व व्याख्यान

०६ मार्च रोजी पीएनजी ज्वेलर्स येथे ‘दुर्गांचे जलसंस्कार’ छायाचित्र प्रदर्शन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 4, 2026
in जळगाव, प्रदर्शन
गोखलेज् ॲडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे छायाचित्रांचे प्रदर्शन व व्याख्यान
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : खान्देशातील सुप्रसिद्ध गोखलेज् अॅडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (गती) तर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला सलग दोन वर्षांपासून रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. याच परंपरेत, येत्या ०६ मार्च २०२६ रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तसेच मार्च महिन्यातील जागतिक जल दिनाचे औचित्य साधून ‘दुर्गांचे जलसंस्कार’ या विषयावर एकदिवसीय छायाचित्र प्रदर्शन व माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गबांधणी करताना जलव्यवस्थापनाला अत्यंत महत्त्व दिले होते. अनेक दुर्गांवर नैसर्गिक तसेच खडक खोदून तयार केलेले टाके, तलाव आणि विहिरी आजही आढळतात. किल्ल्यांवरील पाणीसाठ्यांवरून त्या दुर्गावरील शिबंदी, वस्ती, पर्जन्यमान तसेच दुर्गाचे सामरिक महत्त्व याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे हे केवळ पाण्याचे व्यवस्थापन नसून दुर्गांवर घडवलेले ‘जलसंस्कार’ होते, असे अभ्यासकांचे मत आहे.

या प्रदर्शनात रश्मी गोखले यांनी विविध किल्ल्यांवरील जलसाठ्यांची अभ्यासपूर्ण छायाचित्रे सादर केली आहेत. ‘गती’ संस्थेमार्फत मागील आठ वर्षांपासून दुर्ग संस्कृती या नाविन्यपूर्ण विषयावर संशोधनात्मक कार्य सुरू असून, त्याअंतर्गत कार्यशाळा, व्याख्याने, पुस्तक लेखन, दृकश्राव्य सादरीकरणे तसेच छायाचित्र प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते.

हे छायाचित्र प्रदर्शन जळगाव शहरातील पीएनजी ज्वेलर्स (जिल्हा बँकेसमोर) येथे दुपारी १२.०० ते रात्री ८.०० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत “Clicks च्या कथा” या विषयावर माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानातून छायाचित्रांमागील कथा, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व तसेच किल्ल्यांवरील जलसाठ्यांची रचना व व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

दुर्ग संस्कृती अभियानांतर्गत एकूण ८ कॉर्पोरेट प्रशिक्षण कार्यक्रम आणि २ उपक्रम राबविले जात असून, छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गांवर अमलात आणलेल्या नियम, प्रक्रिया आणि प्रणाली यांचा अभ्यास करून त्यांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली जाते. आजवर २३० हून अधिक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत.

जळगावकरांनी या छायाचित्र प्रदर्शनाचा तसेच “Clicks च्या कथा” या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दुर्ग संस्कृती कोअर टीमचे सदस्य देवदत्त गोखले, रश्मी गोखले, प्रवीण महाजन व श्रीरंग छापेकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: छत्रपती_शिवाजी_महाराजजलव्यवस्थापनदुर्गसंस्कृतीदुर्गांचे_जलसंस्कार
Previous Post

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

Next Post

जळगावचे नागरिक दुबईला सुरक्षित -आ सुरेश भोळे 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावचे नागरिक दुबईला सुरक्षित -आ सुरेश भोळे 

जळगावचे नागरिक दुबईला सुरक्षित -आ सुरेश भोळे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif