• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home गौरव

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ सोहळ्यात मान्यवरांचे प्रतिपादन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 3, 2026
in गौरव, जळगाव, सामाजिक
फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव, दि. १ :सरकारकडून सध्या सर्व काही फुकट देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. धान्य फुकट, वीज फुकट यामुळे समाजाची इच्छाशक्ती कमकुवत होत असून ही फुकटची सवय समाजाला पंगू बनवत आहे, असे ठाम मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे आयोजित ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

हा पुरस्कार सोहळा केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

“हिवरेबाजारमध्ये फुकट काहीच नाही”

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, “आमच्या हिवरेबाजार गावात आम्ही कधीच काही फुकट दिले नाही. लोकसहभाग आणि श्रम यावरच गाव उभे राहिले आहे. आता बजेटमधून पत्त्याचा कॅट आणि दारू द्यायचेच बाकी आहे,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. फुकट संस्कृतीमुळे आत्मनिर्भरतेऐवजी परावलंबित्व वाढत असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

तापमान बदल हे मोठे जागतिक संकट

ते पुढे म्हणाले की, तापमान बदलामुळे जगासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. माती आणि पाण्याचे प्रदूषण वाढत असून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. पुढील २५ वर्षांत शेतीसमोरील आव्हाने अधिक गंभीर असतील. त्यामुळे आजच योग्य नियोजन आणि लोकसहभागातून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

पुरस्कार वितरण सोहळा

या कार्यक्रमात कोल्हापूर येथील अवनी फाउंडेशनच्या कार्यकर्त्या अनुराधा भोसले यांना वैयक्तिक सेवा पुरस्कार, तर नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स कंपनीला संस्थास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

केशवस्मृतीने शहर स्वच्छतेचा विडा उचलावा – अनुराधा भोसले

पुरस्कार स्वीकारताना अनुराधा भोसले म्हणाल्या की, केशवस्मृती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमध्ये सेवाभाव आणि आत्मीयता दिसते. या संस्थेने आता शहर स्वच्छतेचा विडा उचलावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाशिवाय समाजपरिवर्तन शक्य नसल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

शेतीला व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज – विलास शिंदे

सह्याद्री फार्मर्स कंपनीचे प्रतिनिधी विलास शिंदे यांनी सांगितले की, शेतीत अनेक गुंते निर्माण झाले आहेत. एकट्याने नव्हे तर समूहाच्या ताकदीनेच शेतीत बदल घडवता येतो. शेतीकडे सेवा नव्हे तर व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा !
Tags: आचार्य डॉ अविनाशिकेशव स्मृती प्रतिष्ठानपद्मश्रीपोपटराव पवारफुकट संस्कृतीसमाज पंगुसेवा पुरस्कार
Previous Post

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

Next Post

गोखलेज् ॲडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे छायाचित्रांचे प्रदर्शन व व्याख्यान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गोखलेज् ॲडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे छायाचित्रांचे प्रदर्शन व व्याख्यान

गोखलेज् ॲडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे छायाचित्रांचे प्रदर्शन व व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif