• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आपत्ती

जिल्ह्यात २०३ शेतकऱ्यांची आत्महत्या !

तीन मंत्री, तीन खासदार ; पण शेतकऱ्याच्या पदरी निराशा !

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 18, 2026
in आपत्ती, जिल्हा, विशेष बातमी
जिल्ह्यात २०३ शेतकऱ्यांची आत्महत्या !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव – योगेश सुने (नवराज्य Live संपादक) जळगाव जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण २०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक नोंद समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार या प्रकरणांपैकी ११५ प्रकरणे मदतीस पात्र ठरविण्यात आली असून, ७८ प्रकरणे अपात्र, तर १० प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. तीन मंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महत्या याबाबतीत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

महिन्यानुसार पाहता, मार्च २०२५ या महिन्यात सर्वाधिक २९ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे. त्याखालोखाल फेब्रुवारी आणि जुलै महिन्यात प्रत्येकी २३, तर डिसेंबर २०२५ मध्ये २२ आत्महत्यांची नोंद झाली आहे. वर्षातील प्रत्येक महिन्यात आत्महत्यांचे प्रमाण कायम राहिले असून, ही बाब जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

मंत्र्यांचा जिल्हा असून देखील शेतकऱ्याच्या पदरी निराशा.!

जळगाव जिल्ह्याला तीन मंत्री, तीन खासदार आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या व उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे देखील दोन मंत्री आहेत. सर्वश्रुत आहे मात्र,तरी देखील शेतकऱ्याच्या पदरी निराशा का? असा सवाल शेतकरी वर्गामधून करत आहे.

शेती करणे खूप कठीण झाले असून, कर्ज काढून शेतकरी पेरणी करतो त्यातही अस्मानी, सुलताने संकट आल्यानंतर, शासन मदतीसाठी कागदी घोडे लागतात. व त्यातही तो शेतकरी पात्र ठरेलच याची काय हमी. तो मिळणाऱ्या तूट पुंजा मदतीने तो त्याचा खर्च कसा भागवणार.

 

 

शेतमालाला मिळणारा अपुरा दर, कर्जबाजारीपणा, वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती तसेच आर्थिक ताणतणाव यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी आत्महत्यांची संख्या थांबलेली नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मात्र शेतकऱ्याला मंत्र्यांचे पाठबळ मिळण्याची अपेक्षा आहे.

 

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत, कर्जमाफी, हमीभाव आणि मानसिक आधार देणारी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे मत शेतकरी वर्ग व सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगाव जिल्हातीन मंत्रीमदतीच्या अपेक्षाशेतकरी आत्महत्याशेतकऱ्याच्या पदरी निराशाशेतमालाला भावहमीभाव
Previous Post

शिव कॉलनीत शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण!

Next Post

अनुभव घेऊन ज्ञानार्जन कधीही उत्तम !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अनुभव घेऊन ज्ञानार्जन कधीही उत्तम !

अनुभव घेऊन ज्ञानार्जन कधीही उत्तम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif